आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव शहरातील धारणगाव रस्त्याला २ कोटी १० लाख रुपये प्रशासकीय मान्यता – आमदार आशुतोष काळे

 कोपरगाव  शहरातील धारणगाव रस्त्याला २ कोटी १० लाख रुपये

 प्रशासकीय मान्यता  – आमदार आशुतोष काळे



        कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्यांना निधी मेळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून अनेक महत्वाच्या रस्त्यांना ५ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या अत्यंत महत्वाच्या व वर्दळीच्या  रस्त्याला २ कोटी १० लाख रूपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती  आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

                        कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खराब रस्त्यांचा परिणाम शहरातील उद्योग व्यवसायावर होवून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक, महिला, जेष्ठ नागरिक व लहान मुलांना  होत असलेल्या त्रासाची दखल घेवून कोपरगाव शहरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी शहरातील महत्वाच्या विविध रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी कोपरगाव नगरपरिषदेला मिळवून दिला. त्याच बरोबर या निधीला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून अत्यंत महत्वाच्या असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या  धारणगाव रोडच्या रस्त्यासाठी  २ कोटी १० लाख रूपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याचे काम सुरु होणार असून नागरिकांना होत असलेला त्रास कमी होणार आहे. बाजार पेठेवर देखील या खराब रस्त्यांचा परिणाम होत आहे. मात्र लवकरच उर्वरित छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंप), छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते इंदिरापथ (गोकुळनगरी), श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते आचारी हॉस्पिटल, या रस्त्यांच्या देखील निवेदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून या रस्त्यांचे काम सुरु होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments