जनतेच्या माहिती साठी नगराध्यक्ष वहाडणे हे लवकरच विकासकामांची पुस्तिका काढणार --- वसंत जाधव
कोपरगाव प्रतिनिधी:------
कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे लवकरच विकासकामांची पुस्तिका काढणार आहे. त्यातून सर्व वस्तुस्थिती समोर येईल, असे मत वसंत जाधव व विनायक गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विनायक गायकवाड व वसंत जाधव यांनी म्हंटले आहे की, नगराध्यक्ष वहाडणे यांनी कुणाच्याही कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही. याशिवाय सोशल मीडियावरील कंमेन्टबद्दल देखील खुलासे करणार नाहीत असे तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केलेले आहे. गेल्या ५ वर्षांत केलेल्या विकासकामांची पुस्तिका, कार्यवृत्त सविस्तरपणे लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे कुणी कितीही एकतर्फी,अपुऱ्या माहितीवर आधारित बातम्या दिल्या, कंमेंट्स केल्या, अपमानास्पद शब्द वापरले तरीही सर्वच विषयांची समीक्षा या पुस्तिकेत येणारच आहे. त्यानंतरच वहाडणे यावर बोलणार आहे. यावरून जनतेने दिलेली मते व्यर्थ गेली नाहीत हेही लक्षात येणारच आहे. तोपर्यंत वाट पाहा, असे आवाहन गायकवाड व जाधव यांनी केले आहे
0 Comments