आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सामाजिक काम करणे हि प्रत्येकाचीच जबाबदारी महंत रामगिरी महाराज : काळे, कोल्हे यांना जीवनगौरव तर लंके यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 

सामाजिक काम करणे हि प्रत्येकाचीच जबाबदारी 

महंत रामगिरी महाराज : काळे, कोल्हे यांना जीवनगौरव तर लंके यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान





कोपरगाव प्रतिनिधी:---- राज्याचे माजी मंत्री स्व. शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक योगदान अतुलनीय आहे. पत्रकार संघाने त्यांचा केलेला सन्मानही त्यांच्या कार्याची पावती आहे. सामाजिक कार्य करणे हि प्रत्येकाचीच जबाबदारी असते. समाजही कर्तव्यतत्पर व्यक्तीचीच दखल घेतो, असे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.

     कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. ७) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज होते. पत्रकार संघाच्यावतीने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार महंत रामगिरी महाराज व महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते स्व. शंकरराव काळे यांना मरणोत्तर तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर लोकमतचे अहमदनगर आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. 

    यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, बिव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा बँकेेचे संचालक विवेक कोल्हे, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, सुमित कोल्हे, ॲड. रवींद्र बोरावके, डॉ. अजय गर्जे, बिव्हीजी ग्रुपचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख बाळासाहेब कंक्राळे, पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे, सुजाता लंके, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

       कर्मवीर शंकरराव काळे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल बोलताना उपसभापती अर्जुन काळे म्हणाले, स्व. काळे यांचे सामाजिक, शैक्षणिक व सहकारातील कार्य अतुलनीय आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाने दिलेल्या जीवनगौरव पुरस्काराचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सत्काराला उत्तर देताना विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी विधानसभेत तब्बल ३५ वर्षे शंकरराव कोल्हे यांनी बाजू मांडली. पाणी प्रश्नासाठी त्यांनी उभारलेला लढा सर्वश्रुत आहे. पत्रकार संघाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन जीवनगौरव पुरस्कार दिला. हा पुरस्कार आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शक राहील. आदर्श पत्रकारिता पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुधीर लंके म्हणाले, लोकशाहीच्या तीन स्तंभासोबत चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीमध्ये सत्तेबरोबर विरोधकही तितकाच महत्वाचा आहे. हा विरोध व त्याची चिकित्सा, त्रुटी दाखवण्याचे काम सर्वसामान्य जनतेच्यावतीने पत्रकार करीत असतो. मोठ्या शहरांपेक्षा ग्रामिण भागातील पत्रकारिता अधिक आव्हानात्मक आहे. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ हे आव्हान समर्थपणे पेलत आहे.

       अध्यक्षीय समारोपात रमेशगिरी महाराज म्हणाले, स्व. काळे व शंकरराव कोल्हे यांनी या भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले. अनेक संस्था उभारून रोजगार उपलब्ध केला. सर्वसामान्यांच्या विकासाचे काळे, कोल्हे दोन्ही घराणे केंद्रबिंदू ठरले.

सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. तर लक्ष्मण जावळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिंदे, कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज, सचिव संतोष जाधव, खजिनदार सिद्धार्थ मेहेरखांब, संघटक दिलीप दुशिंग, नानासाहेब शेळके, रोहित टेके, सचिन धर्मापुरीकर, सोमनाथ सोनपसारे, लक्ष्मण वावरे, विजय शेळके, राजेंद्र गाडे, निवृत्ती शिंदे, हेमचंद्र भवर, संजय लाड, संजय भवर, योगेश डोखे, मोबीन खान, काकासाहेब खर्डे, योगेश रुईकर, शाम गवंडी, अनिल दीक्षित, अमिन शेख, बिपीन गायकवाड, रवींद्र जगताप, सुनील ससाणे यो यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments