आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

खोपडीत भाजपला भगदाड कोल्हे गटाचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीत दाखल

 खोपडीत भाजपला भगदाड

कोल्हे गटाचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीत दाखल


कोपरगाव प्रतिनिधी:---- आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांचे प्रमुख कार्यकर्ते प्रभावित होत असून कोपरगाव तालुक्यातील खोपडी ग्रामपंचायतीचे कोल्हे गटाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संभाजीराव नवले व शिवसेनेचे उपसरपंच शिवाजीराव वारकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाला धक्का देत खोपडीमध्ये भाजपला भगदाड पडले आहे.  

कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खोपडीचे भाजप कोल्हे गटाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संभाजीराव नवले व शिवसेनेचे उपसरपंच शिवाजीराव वारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले.


      यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, दिलीप दाणे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सरपंच संभाजीराव नवले, उपसरपंच शिवाजीराव वारकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना आता विकास कोण करीत आहे याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. मागील पाच वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास मोठ्याप्रमाणावर झाला असून सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळालेला आहे. तालुक्यातील नागरिकांना भविष्यात देखील अशाच विकासाची अपेक्षा आहे. हि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या प्रकल्पबाधित खोपडी व परिसरातील गावातील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा मोबदला मिळवून देऊन अनेक वर्षांचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे साहजिकच नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे विकासाच्या ज्या अपेक्षा ठेवून खोपडीचे सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांनी विकासाच्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता विकासासाठी मदत करीन.  मागील पाच वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो  विकास झाला तोच विकास यापुढे देखील होईल अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

     याप्रसंगी तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिरसागर, गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड, राहुल जगधने, बाळासाहेब जगताप, शिवाजीराव वारकर, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, रामदास वारकर, मनोज जगताप, दामोधर वारकर, पुंजाहरी वारकर, आदिनाथ वारकर, केशवराव वारकर, जालिंदर वारकर, भाऊसाहेब वारकर, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब मच्छिंद्र वारकर, जगन्नाथ नवले, बाबुराव नवले, राजेंद्र दुशिंग, अण्णासाहेब जाधव, सोमनाथ वारकर, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता गुंजाळ, विस्तार अधिकारी डी.ओ. रानमाळ, ग्रामसेवक श्रीमती शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments