अद्यावत नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ – आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुक्याला कला क्षेत्राचा मोठा वारसा आहे. ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेल्या या भूमीने अनेक महान कलाकार घडवले. या कलाकारांनी आपल्या दर्जेदार कलेच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवर पुरस्कार मिळवून कोपरगावचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे. हा वारसा अखंडपणे पुढे सुरु ठेवण्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त अद्यावत नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने कोपरगाव शहरातील साहित्यसम्राट आणाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आ. आशुतोष काळे व नाट्य कलाकारांच्या यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे ज्येष्ठ कलाकार श्रीमती बिरारी, महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगावच्या भूमीतील गुणवंत कलाकार घडवणारे खुले नाट्यगृह हे कोपरगावचे वैभव आहे. या नाट्यगृहाच्या रंगमंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करून अनेक दिग्गज कलाकार घडले असून या कलाकारांनी नाट्य कलाकार म्हणून भूमिका पार पाडत असतांना थेट चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करून फिल्मी जगतात कोपरगावचे नाव पोहोचवले आहे याचा मला अभिमान वाटतो. हा कलेचा वारसा पुढे असाच सुरु ठेवण्यासाठी शहरात असलेले खुले नाट्यगृहाची वास्तू हि सुस्थितीत असणे गरजेचे आहे परंतु सर्व सुविधा असलेले अद्यावत नाट्यगृह असणे देखील आवश्यक आहे. अनेक नाट्य कलाकार व नाट्यरसिकांची देखील मागील अनेक वर्षापासूनची अद्यावत नाट्यगृहाची मागणी आहे. हि मागणी पूर्ण करण्यासाठी नाट्यगृहाला निधी उपलब्ध करून देवू. खुले नाट्यगृहात यापूर्वी नाटकाचे कार्यक्रम पार पडत होते ते कार्यक्रम यापुढे सुरु राहण्यासाठी नाट्य कलाकारांनी पुढाकार घेवून नाट्यरसिकांसाठी चांगल्या नाटकांचे प्रयोग आयोजित करावे. त्यासाठी नाट्य कलाकारांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी फकीर कुरेशी,दिनकर खरे, डॉ. मयूर तिरमखे, राजेंद्र खैरनार, इम्तियाज अत्तार, आकाश डागा, राजेंद्र जोशी, अॅड. मनोज कडू, चंद्रकांत शिंदे, शैलेश शिंदे, डॉ. किरण लद्दे, गणेश सपकाळ, दिपक गंगवाल, मनोज शिंदे, राहुल देवरे, केतन कुलकर्णी आदी मान्यवरांसह नाट्यरसिक उपस्थित होते.
0 Comments