आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पाच वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॉटेलच्या वेटर गुन्हा दाखल कोपरगाव शहरातील सह्याद्री कॉलनी येथील घटना.

 पाच वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॉटेलच्या वेटर गुन्हा दाखल

कोपरगाव शहरातील सह्याद्री कॉलनी येथील घटना.



कोपरगाव प्रतिनिधी:-------  शहरातील सह्याद्री कॉलनी येथे राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीवर रविवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २;३० वा. खाउला पैसे देण्याचे आमिष दाखवून आरोपी दिलीप रामेश्वर पासवान राहणार सह्याद्री कॉलनी कोपरगाव मुळगाव  कठनपुर तालुका बेडम जिल्हा रोहताज बिहार. याने एका पाच वर्षीय निरागस मुलीचा विनयभंग करून तसेच तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्याकडून   समजलेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील सह्याद्री कॉलनी येथे राहणाऱ्या व शहरातील बियरबारमधे वेटरचे काम करणाऱ्या दिलीप रामेश्वर पासवान याने पिडीत मुलगी वय ५ हि घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला पैसे देण्याचे आमिष दाखवून घरात बोलवले व तिचा विनयभंग करुन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा ऩोंदणी क्रमांक ३३२/२०२१ भादवी कलम ३५४ (ब),३७७,५११ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस सब इंस्पेक्टर दाते हे करत आहे. तसेच घटना झालेल्या ठिकाणी हॉटेल परमिट रूम हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कामगार हे रात्री-अपरात्री अनेकदा धिंगाणा घालत असल्याच्या तक्रारीही परिसरातील नागरिकांनी  केल्या होत्या तसेच संबंधित घरमालकाला देखील याबाबत सांगितले होते. मात्र निर्ढावलेल्या या हॉटेल चालकाने याकडे लक्ष दिले नसून याचा त्रास मात्र तेथे राहणाऱ्या नागरिकांना भोगावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments