शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंच्या निर्लज्ज मालकांनी गाई-वासरे स्वतःच्या घरीच बांधून ठेवावीत --विजय वहाडणे
कोपरगाव प्रतिनिधी:----
कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई येथील स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) मध्ये नियमितपणे दररोज सरासरी 3 ते 5 म्हैसवर्गीय जनावरे कापली जातात. कोणत्या दिवशी कुणी व किती जनावरे कापली याची नोंदणीही नगरपरिषदेच्या रजिस्टर ला केली जाते. मी स्वतः आज संजयनगर, बैल बाजार रोड भागात जाऊन कसाई व्यावसायिकांची मिटिंग घेतली. त्या भागात गोवंशहत्या पुर्णपणे बंद आहे हेही बघितले. असल्याचे नगराध्यक्ष विजय वाढणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे तसेच याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,
मागील महिन्यात प्रशासनाने ज्या ठिकाणी कारवाई केली त्या ठिकाणच्या जागा मालकांनीही आम्ही पुन्हा चुकीचे काहीच करणार नाही असे आश्वासनही दिले. आम्ही काही नियमबाह्य केल्यास आमच्यावर कारवाई करा असेही कसाई व्यावसायिकांनी स्वतःहून सांगितले. स्वतःच्या जागेत ते नियमानुसार बांधकाम करून जागेचा वापर करू शकतात. त्याठिकाणी चुकीचे, नियमबाह्य काहीही सुरू नाही हेही मी बघितले. यानंतर कुणीही गोवंशहत्या करून कायदेभंग केला तरच कठोर कारवाई करण्याचेही सर्वानुमते ठरले.
आता तरी शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंच्या निर्लज्ज मालकांनी गाई-वासरे स्वतःच्या घरीच बांधून ठेवावीत. गाई शहरातील कचरा-कैरीबॅग खाऊन आजारी पडतात, रहदारीला अडथळा होतो, अपघात होतात याचे तरी भान ठेवावे ही अपेक्षा. अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी प्रसिद्धिपत्रकात व्यक्त केले आहे
----------विजय वहाडणे
1 Comments
गोमाता बांधा आणि गाढव डुक्कर मोकळे सोडा
ReplyDelete😀😀😀