आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

१५ डिसेंबरला रब्बीचे पहिले आवर्तन, दुसरे ५ फेब्रुवारीला पाच आवर्तन देण्याचे नियोजन करा -आमदार आशुतोष काळे

 १५ डिसेंबरला रब्बीचे पहिले आवर्तन, दुसरे ५ फेब्रुवारीला

पाच आवर्तन देण्याचे नियोजन करा -आमदार आशुतोष काळे

कोपरगाव-राहाता येथे कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न


कोपरगाव प्रतिनिधी:---  पाटबंधारे विभागाने रब्बीचे दोन आवर्तने देऊन उन्हाळ्यात तीन आवर्तन असे एकूण डाव्या-उजव्या कालव्यांना पाच आवर्तने देण्याचे नियोजन करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली असून १५ डिसेंबरला रब्बीचे पहिले व ५ फेब्रुवारीला दुसरे आवर्तन सुटणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. उन्हाळ्याचे आवर्तन १५ एप्रिल ऐवजी ५ एप्रिलला द्या, शेतकऱ्यांनी मांडलेल्या  समस्यांचे निराकरण लेखी स्वरुपात शेतकऱ्यांना कळवा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे डाव्या कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक व राहाता येथे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली राहाता येथे पार पडली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे, संजय आगवण, बाळासाहेब बारहाते, अशोक मुरलीधर काळे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, जी.प.सदस्य राजेश परजणे, महानंदचे संचालक राजेंद्र जाधव,सभापती पोर्णिमा जगधने, सदस्य अनिल कदम, चंद्रशेखर कुलकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नारायण मांजरे, सुदामराव गाडे, शांताराम सांगळे, कारभारी आगवण, सोमनाथ चांदगुडे, राजेंद्र खिलारी, अधिक्षक अभियंता श्रीम.अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की, मागील वर्षी डाव्या-उजव्या कालव्याच्या वितरिकांची ६० लाख निधीतून दुरुस्ती केली असून यावर्षी देखील पाटबंधारे विभागाने वितरिकांची तातडीने दुरुस्ती करावी. कागदावर पाणी मागणी खूप कमी आहे. सर्व शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरले पाहिजे त्या सर्वच शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्याकडून पाणी मिळवून देण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न राहतील. पाणीपट्टी ब्लॉक, समन्यायी पाणी वाटप कायद्यात बदल करणे, मेंढेगिरी समितीच्या शिफारशीमध्ये बदल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकारकडून हे प्रश्न सोडवून घेऊ. त्याबाबत जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील यांच्या समवेत बैठक घेऊ व गोदावरी कालव्यांसाठी जास्तीत जास्त पाणी कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील यांनी गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे मान्य करून दरवर्षी १०० कोटी रुपये देणार असून ८५ कोटी रुपये दुरुस्ती खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेल्या  आहेत. पैकी ४५ कोटी रुपयांच्या दुरुस्तीच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत. व उर्वरित ४० कोटीच्या कामाचे देखील निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. पुढील टप्प्यात होणाऱ्या कामातून एकाच वेळी खालच्या आणि वरच्या शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. या बैठकीत पद्माकांत कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, राजेंद्र खिलारी, शिवाजी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व समस्या मांडल्या.     

चौकट :- कालवा सल्लागार समितीची बैठक हि लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी खुले व्यासपीठ आहे. २०१३ पर्यंत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक २०१४ पासून मुंबईला होत होती. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहाता येत नव्हते. शेतकऱ्यांची हि अडचण ओळखून आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून २०१९ पासून हि बैठक लाभक्षेत्रात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवर्तना संबंधी आपल्या अडचणी बिनदिक्कतपणे मांडता येत आहेत. मात्र ज्यांनी हि बैठक पाच वर्ष मुंबईमध्ये घेतली. त्यांना हि बैठक लाभक्षेत्रात होत असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपले प्रश्न मांडता येत असल्याचे दु:ख आहे. त्यामुळे नियोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून गोंधळ घालण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी आहे.- आ.आशुतोष काळे.

चौकट :- वैतरणेचे पाणी मुकणे धरणात वळविणेसाठी वैतरणेच्या धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत. मात्र वैतरणा धरण झाल्यानंतर काही जमिनी धरणामध्ये गेलेल्या नाहीत. त्या जमिनी त्या शेतकऱ्यांना परत पाहिजे. त्याबाबत – आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे याबाबत शासन लवकरच निविदा काढणार असून या जमिनी त्या शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहे. त्या जमिनी दिल्यांनतर सॅडल डॅमचे काम पूर्ण होऊन दोन ते अडीच टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून गोदावरी कालव्यांची तुट भरून येण्यास मदत होईल

Post a Comment

0 Comments