कर्मवीर शंकररावजी काळे यांना ९ व्या पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांकडून अभिनंदन
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ९ व्या पुण्यस्मरणानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात उपस्थित राहून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व उद्योग समुहावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.
शुक्रवार (दि.५) रोजी कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ९ व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे,अॅड.प्रमोद जगताप,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे,कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे,बाळासाहेब बारहाते, ज्ञानदेव मांजरे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, संचालक राजेंद्र ढोमसे, माजी संचालक सिकंदर पटेल, पंचायत समितीच्या सभापती सौ. पौर्णिमा जगधने, राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक वृंद, उद्योग समूह व सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व हितचिंतक आदी उपस्थित होते
0 Comments