Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

ब्राम्हणगाव येथील जगदंबामाता मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर व तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी ---- आमदार आशुतोष काळे.

 ब्राम्हणगाव येथील जगदंबामाता मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर

 व तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी ---- आमदार आशुतोष काळे.कोपरगांव प्रतिनिधी:------ कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबामाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात यावा व तालुक्याच्या पूर्व भागातील तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी अहमदनगर येथील माऊली सभागृह येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्या. सदर मागण्यांना पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री. जगदंबा माता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर केला असून तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

            राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.०८) रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपस्थित असलेले आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांकडे मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली आहे. यामध्ये तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबामाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात यावा, ग्रामीण भागातील ओव्हर लोड डी.पी. साठी निधी मिळावा,वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी निधी मिळावा, तांडा सुधार योजनेचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात याव्या, कृषी विभागाची आत्मा कमिटीची मान्यता मिळावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर करावा,  भूमी अभिलेख कार्यालयाच्या फर्निचर प्रस्तावास मंजुरी द्यावी तसेच कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया या योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्या करिता एकच दुग्ध प्रक्रिया प्रकल्प असून  जास्तीत जास्त सहभागाकरिता सदर प्रकल्प बदलून मिळणे आदी मागण्या मांडल्या. सदर मागण्यांना पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव व पंचक्रोशीतील गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री.जगदंबा माता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर केला असून तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे. तसेच कृषी विभागाच्या आत्मा कमिटीला मान्यता देवून तांडा सुधार योजनेचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करणार असल्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले


आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मागील वर्षी श्री.क्षेत्र मयुरेश्वर’ देवस्थान व कोकमठाण येथील श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे श्री. जगदंबा माता मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे या मंदिराकडे जाणारे रस्ते, सुशोभिकरण तसेच परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे ब्राम्हणगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्यामुळे तिळवणी व पूर्वभागातील नागरिकांनी आरोग्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. आशुतोष काळे याचे आभार मानले आहे. या बैठकीसाठी ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले,उपाध्यक्ष प्रताप शेळके, आ.रोहित पवार, आ. लहू कानडे, आ. मोनिका राजळे, आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,जि.प. मुख्य कार्यकारी राजेंद्र क्षीरसागर, अति. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आधी जण या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments