आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोरोनोच्या नवीन नियमात ग्राहकाची शिक्षा दुकान मालकास नको, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.--विजय वहाडणे

 कोरोनोच्या नवीन नियमात ग्राहकाची शिक्षा दुकान मालकास नको, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.--विजय वहाडणेकोपरगाव प्रतिनिधी:------

कोरोना नियंत्रणात येत असतांनाच जगभरातून कोरोनाच्या नविनच विषाणूचा वेगाने प्रसार सुरू झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणांत येत आहेत.त्यामुळेच शासनाने कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.नवीन नियमावली जाहिर केली आहे.कठोर नियम-शिक्षा-दंड आणायलाच पाहिजेत.पण असे नियम करत असताना कुणावरही नाहक अन्याय होऊ नये याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
कुठल्याही व्यावसायिक आस्थापनात-दुकानात विनामास्क एक जरी ग्राहक आढळला तर आस्थापना चालकाला,दुकान मालकांना दहा हजार रू.दंड आकारण्यात येईल असा अतिशय अन्यायकारक नियम-आदेश शासनाने काढला आहे.ग्राहकांच्या चुकीची शिक्षा दुकान मालकाला,व्यापाऱ्यांना देणे पूर्णपणे चुकीचे आहे.कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असा प्रकार होऊ द्यायचा नसेल तर हा नवीन नियम-आदेश शासनाने त्वरित मागे घ्यावा. अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे अधिक बोलताना ते म्हणाले की,

आधीच दोन वर्षात लहान मोठ्या सर्वच व्यवसायिकांवर  अरिष्ट कोसळलेले आहे.त्यात असा अन्याकारक देश देऊन शासनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडू नये.
जनतेनेही कोरोनाचा पराभव करण्यासाठी मास्कचा न चुकता वापर करून सामाजिक अंतर हे नियम पाळलेच पाहिजेत.
नागरिकांनी हे नियम पाळले नाहीत तर स्वतःबरोबरच संपुर्ण समाजालाच धोका निर्माण होईल याचा गांभीर्याने विचार करून आपली वर्तणूक ठेवली पाहिजे. असेही शेवटी नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले.


Post a Comment

0 Comments