कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचा रविवारी पुरस्कार वितरण सोहळा
रामगिरी महाराजांच्या हस्ते होणार वितरण : कोल्हे, स्व. काळे व लंके यांना पुरस्कार
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार यंदाच्या वर्षात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांना राज्यस्तरीय ' जीवन गौरव पुरस्कार', माजी मंत्री स्व. शंकरराव काळे यांना राज्यस्तरीय 'मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार' तर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल ' लोकमत' चे अहमदनगर आवृत्तिप्रमुख सुधीर लंके यांना " राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवारी ( दि. ७ ) सकाळी १०.३० वाजता कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते तर कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार अशोक काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे यांनी दिली आहे
0 Comments