निधी आणूनही बहुमताच्या जोरावर विकासकामांना विरोध
हि परिस्थिती बदलण्यासाठी नगरपरिषदेची सत्ता द्या - आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:---- मागील दोन वर्षात कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असतांना देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी आणला. मात्र विकासाची मानसिकता नसल्यामुळे व श्रेय न मिळण्याच्या भीती पोटी विकास कामांना बहुमताच्या जोरावर विरोध केला जातो. त्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहर मागे पडत चालले आहे. हि परिस्थिती बदलण्यासाठी येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुमताने सत्ता द्या असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरात प्रभाग क्र. ५ मध्ये संदीप देवळालीकर यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक निवडून आले. त्यावेळी जनतेने दिलेला कौल मान्य करून शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक नेहमी विकासाच्या बाजूने उभे राहिले. मात्र २०१९ विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेसह शहरातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून सेवा करण्याची संधी दिली. त्या विश्वासाला तडा जावू नये यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम पूर्ण केले. दोनच वर्षात १२ कोटी रुपये निधी कोपरगाव शहराच्या विकासासाठी आणला ते देखील कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत. ५ नं. साठवण तलावाच्या १२० कोटीच्या कामाला तांत्रिक मंजुरी देखील आणली. याउलट मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार, सर्व परिस्थिती अनुकूल असतांना देखील त्यांना ते जमले नाही त्यामुळे विरोधक धास्तावले. त्यांनी शहरातील विकासकामांना बहुमताच्या जोरावर विरोध करून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे यापुढे हि परिस्थिती बदलावी लागणार आहे. कोपरगाव शहराचा विकास यापुढे थांबू देणार नाही. तुम्ही नगरपरिषदेची सत्ता द्या, विकास कामांना निधी आणायची व विकासाची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शाखा संस्थापक संदीप देवळालीकर, अध्यक्ष अमोल देवकर, उपाध्यक्ष जुबेद अत्तार, सचिव सलीम शेख, संघटक नवजोत खरात, खजिनदार ओम दुसाने, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, कार्तिक सरदार, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, डॉ. तुषार गलांडे, सचिन परदेशी, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, राहुल देवळालीकर, राहुल आदमाणे, दिनेश संत, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, आकाश डागा, किशोर डोखे, रवींद्र राऊत,सागर लकारे, रितेश राऊत, बाळासाहेब सोनटक्के, एकनाथ गंगूले, पप्पु गोसावी, गोरक्षनाथ कानडे, महेश उदावंत, गणेश बोरुडे, संतोष टोरपे, संतोष बारसे, फिरोज पठाण, प्रसाद रुईकर, प्रा. अंबादास वडांगळे, मुकुंद भुतडा, श्याम शिरसाठ, गौतम खंडीझोड, संजय ठाकूर, अभिषेक कोकाटे, दिनेश पवार, शुभम लासुरे, विकी जोशी, मनोज नरोडे, हर्षल गवळी, जनार्दन शिंदे, रिंकेश खडांगळे, प्रताप गोसावी, प्रतिक रुईकर, किशोर लकारे, विजय शिंदे, बाळासाहेब देवकर, शुभम भुजबळ, समर्थ दिझिन, गौरव जंगम, सोमेश शिंदे, तेजस देवळालीकर, तुषार कहार, सोमनाथ शिंदे, निरंजन उदावंत, तुषार चिकने, स्वप्नील दुसाने, प्रसाद उदावंत, आशिष देवळालीकर, अनिकेत चिंचपुरे, सचिन खैरनार, काकासाहेब कहार, तुषार कहार, हारूण शेख, ओम बोराडे, मुन्ना पठाण, दिपक कराळे, शोएब शेख, अनिकेत पवार, अझर शेख, जावेद शेख, चांदभाई पठाण, आदी उपस्थित होते
0 Comments