आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सोमवार (दि.२९) रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक

       

सोमवार (दि.२९) रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक

                          


कोपरगाव प्रतिनिधी:---- गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवार (दि.२९) रोजी कोपरगाव व राहाता येथे होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

त्यानुसार डाव्या कालव्याची बैठक हि सोमवार (दि.२९) रोजी सकाळी १०.०० वाजता आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे होणार आहे. तसेच उजव्या कालव्याची बैठक दुपारी ३.३० वाजता राहाता येथे होणार आहे.

मागील पाच वर्षात कालवा सल्लागार समितीच्या बैठका मुंबईला घेतल्या जात असल्यामुळे गोदावरी कालव्याचे लाभधारक शेतकरी या बैठकींसाठी उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे आवर्तन व आवर्तनाबाबत येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांना मांडता येत नव्हत्या. मात्र आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी लाभधारक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घेण्याचा शब्द पूर्ण करून या बैठका लाभ क्षेत्रात होत आहे. त्यामुळे मागील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीवेळी अनेक शेतकऱ्यांना उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडता आल्या होत्या. यावेळी देखील लाभधारक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments