आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ३९ विध्यार्थ्यांची एसएपी प्रशिक्षणातून विप्रो कंपनीत निवड - श्री अमित कोल्हे सुुरूवातीस मिळणार रू ३. ५ लाखांचेे वार्षिक पॅकेज

        संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ३९ विध्यार्थ्यांची एसएपी प्रशिक्षणातून  विप्रो कंपनीत निवड  - श्री अमित कोल्हे

  सुुरूवातीस  मिळणार रू ३. ५  लाखांचेे  वार्षिक  पॅकेज



कोपरगांव प्रतिनिधी:---- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची  नोकरदार होण्याची  स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनीने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या  जागतिक पातळीवरील कंपनीशी  सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे विध्यार्थ्यांना प्रशिक्षण  देवुन सक्षम केल्या जाते. अलिकडेच या केंद्रातुन प्रशिक्षण  घेतलेल्या २०२०- २१  च्या बॅचमधिल संजीवनीच्या ३९ विध्यार्थ्यांची  विप्रो  कंपनीने सुरूवातीस रू ३. ५  लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की अनेक ठिकाणच्या इंजिनिअरींग काॅलेज मधिल विध्यार्थी पदवी पर्यंतचे शिक्षण  पुर्ण झाल्यावर नोकरी मिळण्याच्या हेतुने मोठ्या शहरात जावुन लाखो रूपये खर्चुन आपल्या इंजिनिअरींग शाखा निहाय अधिकचा कोर्स करतात. परंतु संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने पदवी पर्यंतचे शिक्षण  चालु असतानाच एसएपी या कोर्स अंतर्गत २००  तासांचे अधिकचे शाखानिहाय प्रशिक्षण  देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे ज्याला नोकरी पाहीजे त्याला चांगल्या कंपनीत व चांगल्या पगाराची नाकरी मिळत आहे.

अलिकडेच विप्रो कंपनीने घेतलेल्या मुलाखतींचा निकाल जाहिर झाला आहे. यात निवड झालेल्या विध्यार्थ्यां मध्ये  काॅम्प्युटर, मेकॅनिकल, इन्फर्मेशन टेक्नॅालाॅजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग मधिल अक्षय संजिव फासले, अक्षदा दिपक तनपुरे, ऋतुजा विजय माने , ओंकार नानासाहेब तनपुरे, हर्षदा  दत्तात्रय गिरमे, कांचन प्रेमचंद  सुपे, राधिका सुनिल औताडे, अनिकेत ललितराव धनवटे, चैताली किशोर  गुमर, स्नेहल महेंद्र जेजुरकर, प्रतिक्षा बाळासाहेब शेळके, वैष्णवी  बाबासाहेब गुंजाळ, कोमल सुनिल जाधव, प्रगती अरविंद थोरात, तनुश्री रवि हलवाई, निखिल राजेंद्र भास्कर, संतोष दशरथ  चव्हाण, नुतन गोकुळ भोसले, स्वाती गणपत जाधव, संकेत उध्दवराव सोळंके, श्वेता  आसाराम वाडेकर, प्रतिक्षा बाळासाहेब फुंदे, सचिन मधुकर वाबळे, ऋषिकेश  दत्तात्रय कोते, धनश्री चंद्रकांत वाघ, पुणम रानोबा रिठ्ठे, ज्ञानेश्वरी  अरूण पवार, परमेश्वर  अंकुश  इंगळे, भरत भानुदास काकडे, रोहिणी संजय जगझाप, पोपट हनुमंत जाधव, तुषार  सुरेश  पटारे, सुहास बाळासाहेब गाढवे, सागर आप्पासाहेब घारे, दिक्षा युवराज आवारे, विशाल  परसराम कथने, पौर्णिमा धनंजय आठरे, शुभम प्रकाश  जगधने व मयुरी अनिल शेळके यांचा समावेश  आहे.

माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे  अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, एसएपी कोर्सचे समन्वयक डाॅ. ए. बी. पवार व ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments