कोपरगाव शहरातील गोदावरी नदी पत्रात आढळला एक २७ वर्षीय इसमाचा मृतदेह
कोपरगाव प्रतिनिधी:------ शहरातील गोदावरी नदीच्या पात्रात रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एका अंदाजे २७ वर्षीय पुरुष जातीचा अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला आहे सदरील इसमाचे वर्णन शरीराने मजबूत गोल चेहरा सरळ नाक सावळा वर्ण बारीक दाढी डाव्या हाताच्या चामडीवर बदामी आकाराचे दिल त्यावर राजू नाव लिहिलेले अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट त्यावर काळ्या रंगाचा पट्टा त्यावर डाव्या बाजूला C K असे इंग्रजी नाव असून निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व ऑरेंज रंगाची अंडरवेअर घातलेली आहे तरी असे वर्णन असणाऱ्या इसमाबद्दल कोणालाही माहिती असल्यास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याशी ०२४२३ २२२३३३,पोलिस निरीक्षक वासुदेव देसले ९८२३१०१७७८ सहाय्यक फौजदर पवार ७०६६२०२०३० यावर संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव शहर पोलिसांनी केले आहे
0 Comments