आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

१२ टक्के वेतनवाढ जाहीर करून प्रत्यक्षात कामगारांनावेतनवाढ अदा करणारा कर्मवीरशंकरराव काळे कारखाना राज्यात पहिला

  १२ टक्के वेतनवाढ जाहीर करून प्रत्यक्षात कामगारांनावेतनवाढ अदा करणारा

कर्मवीरशंकरराव काळे कारखाना राज्यात पहिला



          कोपरगाव प्रतिनिधी:---- महाराष्ट्र शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत दि. ९/९/२०२१ रोजी साखर कामगारांना १२% वेतन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी तात्काळ अंमलबजावणी केली. त्यानुसार कामगारांना १२ टक्के वेतनवाढ माहे ऑक्टोबर २०२१ पासून लागू करून प्रत्यक्षात कामगारांच्या बँक खात्यात देखील जमा केली आहे. त्यामुळे कामगारांना १२ टक्के वेतनवाढ प्रत्यक्षात देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना राज्यात पहिला ठरला आहे. याबाबत कोपरगाव तालुका साखर कामगार सभेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आ.अशोकराव काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे. यावेळी जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ, कामगार प्रतिनिधी अरुण पानगव्हाणे, सचिव प्रकाश आवारे, खजिनदार संजय वारुळे व कायदेशीर सल्लागार वीरेंद्र जाधव उपस्थित होते.

          कामगार वेतन वाढीबाबत आ.आशुतोष काळे आग्रही होते. त्रिपक्षीय समिती कराराची मुदत संपून बरेच दिवस झाले असतांना त्यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे त्रिपक्षीय समितीचा १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय होताच त्या निर्णयाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी केली. त्याचबरोबर ऑक्टोबर २०२१ पासून कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देऊन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने कामगारांना वेतनवाढ लागू करणेसंदर्भात राज्यात सर्वप्रथम निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे.   

      फक्त घोषणा नव्हे; प्रत्यक्ष अंमलबजावणी

     चौकट :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना माजी आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श विचारांवर कारभार सुरु आहे. हि जबाबदारी सांभाळत असतांना ऊस उत्पादक शेतकरी व कामगार तसेच कारखान्याशी संबंधित घटकांबाबत आजवर ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत त्या-त्या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली असून तीच परंपरा कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देवून  पुढे सुरु ठेवली आहे.शेतकऱ्यांना देखील एकरक्कमी २५००/- दर दिला असून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. व कामगारांच्या फरकाची रक्कम देखील लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आहे. - आ.आशुतोष काळे

Post a Comment

0 Comments