आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिर्डी शहरात मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिराचे आयोजन:--- डॉक्टर महेश प्रभू.

 शिर्डी शहरात मोफत ॲक्युपंक्चर उपचार शिबिराचे आयोजन:--- डॉक्टर महेश प्रभू.शिर्डी प्रतिनिधी:------ शहरात साईबाबांच्या पवित्र भूमीत सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जागतिक कीर्तीचे डॉक्टर एम बी  प्रभू  व चायना येथून वैद्यकीय शिक्षण घेऊन आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा देशातील जनतेला उपलब्ध करून देणारे डॉक्टर साईश प्रभू तसेच डॉ ज्योत्स्ना व वैद्यकीय पथक  यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक २१ नोव्हेंबर ते२८ नोव्हेंबर या कालावधीत मानेचा त्रास कंबर दुखी सांधे दुखी गुडघे दुखी टाच दुखणे संधिवात आदीसह विविध आजारावर मोफत तपासणी व उपचार केले जाणार असल्याचे डॉक्टर एम बी प्रभू यांनी सांगितले

     डॉक्टर एम बी  प्रभू यांनी या गोदरी शिर्डी येथे मोफत तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले होते आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा शिर्डीचा परिसरातील रुग्णांना झाला पाहिजे या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे डॉक्टर एम बी  प्रभू यांनी गेल्या पस्तीस वर्षात ६०हजारापेक्षा अधिक असाध्य रोगावर उपचार केले असून त्याचा फायदा वेगवेगळ्या लाखो रुग्णांना झालेला आहे वेगवेगळ्या आजारावर संशोधन करून चायनीज ॲक्युपंचर पद्धतीने उपचार करून अनेक रुग्णांना त्यांनी बरे केले आहे त्यासाठी त्यांना जागतिक पातळीवरचे विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत सदरची शिबिर शिर्डी शहरातील पोलीस स्टेशन लगत असलेल्या त्यांच्या हॉस्पिटल मध्ये संपन्न होणार आहे या शिबिरासाठी दोन दिवस मोफत तपासणी केली जाणार असून इतर सहा दिवस रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत  या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन डॉक्टर महेश प्रभू यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे

Post a Comment

0 Comments