आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत अथर्व थोरात विजयी

 खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत अथर्व थोरात विजयी
कोपरगाव प्रतिनिधी ----: एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील इ.१२वी तील विद्यार्थी अथर्व महेश थोरात याने कोपरगाव येथील माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित    खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत नामांकित खेळाडूंवर मात करत  खुल्यागटात एकूण ५ डावामध्ये अजिंक्य राहून प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण ७५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या पूर्वी अथर्वने संगमनेर येथील बुद्धीबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. त्याला क्रिडाशिक्षक नितीन सोळके यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. चि.अथर्व याच्या यशस्वी कामगिरी बद्दल एस.एस.जी.एम काॅलेजचे प्राचार्य डाॅ. शंकर थोपटे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, बाबासाहेब गांगर्डे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, कोपरगाव चेस क्लबचे राजेंद्र कोळपकर, नितीन जोरी, यश बंब, प्रमोद वाणी, संकेत गाडे, बापूराव थोरात यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments