आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शेतकरी पंधरवाडा निमित्त बँक ऑफ बडोदा च्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा संपन्न

 शेतकरी पंधरवाडा निमित्त बँक ऑफ बडोदा च्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा संपन्न




कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहण्यासाठी बँक ऑफ बडोदा कोपरगाव शाखेसह १६ शाखांच्या वतीने शेतकरी व बडोदा शेतकरी पंधरवडा निमित्त मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि.२६ ऑक्टोबर रोजी शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी डेप्युटी मॅनेजर पुणे महाफुज निशांत,रिजनल मॅनेजर रामावतार पालिवाल,मयंक भूषण,अमोल महाजन,तानाजी बेलदार,पुष्पराज गौतम,द्वारकधीश ठाकूर,तुषार लांडे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक अरुण येवले,शिवाजी वक्ते, विश्वास महाले, कैलास राहणे,अण्णासाहेब ठाकरे, दत्तात्रय चौधरी , उत्कर्ष शर्मा,आशिष बोदवडे,नितीन वाबळे,कुणाल तिमाखे, सूरज रागासे,किरण मॅडम,राजू गाडे,गायबाई मैदंड, दीपक पवार ,राहुल जाधव आदींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
यामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी पशुपालन कर्ज योजना, शेती अवजारे कर्ज योजना, आधुनिक तंत्रज्ञान शेती कर्ज योजना, तात्काळ कर्ज योजना आदी योजनांचा लाभ मिळाले. मेळाव्यात शेतकरी बांधवाना पिकनिहाय पतपुरवठा, शेतकऱ्यांना खत वाटप,बँकेची माहिती, पशु चिकित्सा, कार ,ट्रेकटर,मोटारसायकल, महिला बचत गट आदींबाबत कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना रामावतार पालिवाल म्हणाले की, बँक ऑफ बडोदामध्ये नगर जिल्ह्याचे नेहमी मोठी योगदान असून बँके मार्फत कृषी कर्ज,सोने तारण कर्ज असे १३१ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले आहे.तसेच आज देखील  येथील १६ शाखांच्या वतीने ४ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे.तसेच कर्जदार शेकऱ्यांचे देखील बँकेला नेहमी सहकार्य असावे अशी अपेक्षा आहे.तसेच मागील वर्षापेक्षा जास्त ताकतीने बँक ऑफ बडोदा शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
महफुज निशांत म्हणाले की, प्रत्येक वर्षी शेतकरी पंधरवडा बँक ऑफ बडोदाच्या वतीने साजरा केला जातो. शेतकऱ्याचे आपल्यासाठी व देशासाठी मोठे योगदान असून आपल्याला शेतकरी यांच्याशी भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी त्यांच्या समस्यांना आधार देण्याचा मुख्य उद्देश असतो.यामध्ये जवळ जवळ ५०० कोटी कर्ज शेतकऱ्यांना वाटलेले आहेत.तसेच यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना बँकेशी जोडा व त्यांच्या गरजा भागवण्याचे काम बँक ऑफ बडोदा यापुढेही करेल.बॅकेचा नेहमी एकच उद्देश असतो की आपण बँकेतून पैसे घेऊन आपली आर्थिक उन्नती करून उद्योग व्यवसाय वाढवावा तसेच बँक शैक्षणिक, कृषी,सोने तारण,ड्रीप,सोलर, यासह अनेक गोष्टीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, आपले शेतकरी आत्मनिर्भर झाले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. तसेच शेतकरी मोठ्या आशेने बँकेत येतो व त्यामुळे त्याचा उदर निर्वाह चांगला होत असतो.अनेकांनी करोना काळात संघर्ष केला आहे.त्यामुळे त्यातून अनेकांनी उभारी घेतली असून अनेक अधिकाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन शेतकरी नागरिकांना आर्थिक स्थर उंचावण्यास मदत केली आहे.तसेच पिकवलेल्या मालाला भाव मिळेल की नाही याचा भरवसा नाही हे मोठं दुर्दैव असून बँकेने शेतकऱ्यांना सांभाळून घ्यावे व सहकार्य करावे, सरकार बदलले का सरकार निर्णय बदलता ,बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटणारे आता कुठे गेले आहेत ,या सरकार मधील लोक सुग्नधी तंबाखू तर कोण ड्रग्ज वर बोलत आहे.त्यांनी शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असून लोकप्रतिनीधी हा जनतेने विश्वासाने निवडून दिलेला असतो मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कारवाई होतांना दिसत नाही असेही कोल्हे शेवटी म्हणाल्या.
ककार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वारकधीश ठाकूर व तानाजी बेलदार,अमोल महाजन यांनी केले.तर आभार मॅनेजर पुष्पराज गौतम यांनी मानले यांनी मानले

Post a Comment

0 Comments