कृत्रिम साधनांच्या मदतीने दिव्यांगांच्या अडचणी दूर होतील-आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी :------ सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मतदार संघातील प्रत्येक दिव्यांग बंधूं-भगिनींना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आपले जीवन जगता यावे यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले शासनाचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग बांधवांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. यामागे दिव्यांगांना स्वावलंबी करण्याचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मोफत वाटप करण्यात आलेल्या कृत्रिम साधनांच्या मदतीने दिव्यांगांच्या अडचणी दूर होतील असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ यांच्या सौजन्याने व फेलोशिप ऑफ दि फिजिकल हॅन्डीकॅप्ड, मुंबई यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग नागरिकांना आवश्यक साधनांचे मोफत वाटप आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
मतदार संघातील दिव्यांग नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी विविध उपक्रम राबविले असून या उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांची नोंदणी करून या नागरिकांना शासनाचे आवश्यक असलेले दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून देऊन दिव्यांगांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्याचबरोबर अपंगत्वामुळे मनामध्ये परावलंबीत्वाची भावना निर्माण होऊ नये. दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवन सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यावे यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या साधनांची नोंदणी करून ते साहित्य आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते २०० दिव्यांग बांधवांना १० लक्ष रुपये किमतीचे कृत्रिम साधने यामध्ये व्हीलचेअर, वॉकर, तीन चाकी सायकल, वॉकिंग स्टिक, ट्रायपॅॉड, कॉड्रीपॉड, स्लीपर चेअर,अॅल्युमिनियम क्रचेस, फोल्डिंग वॉकर, एलबो क्रचेस, कृत्रिम पाय, कॅलीफर आदी वस्तूंचे वाटप मोफत देण्यात आले. त्यावेळी प्रत्येक दिव्यांगांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. दिव्यांग बांधवांच्या अडचणी दूर करून त्यांना आधार देण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
यावेळी फेलोशिप ऑफ दि फिजिकल हॅन्डीकॅप्ड, मुंबईचे मानद सचिव विलास कोलगावकर, जनरल मॅनेजर अत्रीनंदन ढोरमारे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, मनसे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाक रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे, राहुल रोहमारे, पंचायत समिती सदस्य अनिलज कदम, मधुकर टेके, दिलीप दाणे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, नगरसेवक गटनेते विरेंन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजीमेहमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. माधवी वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, रमेश गवळी, कृष्णा आढाव, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, रावसाहेब साठे, सचिन परदेशी, बाळासाहेब रुईकर,अशोक आव्हाटे, राहुल देवळालीकर, रवींद्र राऊत, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, एकनाथ गंगूले, कार्तिक सरदार, आकाश डागा, शुभम लासुरे, प्रताप गोसावी, मनोज नरोडे, किशोर डोखे, योगेश नरोडे, दिनेश शेलार, अक्षय आंग्रे, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरनार, दिनेश पवार, शंकर घोडेराव, किरण बागुल, मनसे दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, योगेश गंगवाल, भाऊसाहेब पारखे, संजय गिते, अतुल गुरसळ, नारायण कटेकर, सुनील फंड, राजेंद्र थोरात, आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते
0 Comments