संजीवनी ज्यु. काॅलेजचा ऋषिकेश गाडेकर ९९. ९७ पर्सेंन्टाईल मिळवुन राज्यात ३२ वा- श्री नितीन कोल्हे
एमएचटीसीईटीच्या परीक्षेत ३० विद्यार्थी ९० पर्सेन्टाईलच्या वरती
कोपरगांव प्रतिनिधी:----- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत आक्टोबर/नोव्हेंबर, २०२१ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र तसेच इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये (एमएचटीसीईटी) संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या ऋषिकेश शरद गाडेकर या विद्यार्थ्याने ९९. ९७ पर्सेन्ंटाईल मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवित पीसीएम गटात राज्यात ३१ वा व काॅलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर पीसीबी गटात संजीवनी ज्युनिअर काॅलेजमध्ये किर्ती दत्तात्रय निकम हीने ९९. ०० पर्सेन्टाईल मिळवुन प्रथम क्रमांकाची माणकरी ठरली. अत्यंत अवघड पण तितक्याच महत्वपुर्ण एमएचटीसीईटीच्या परीक्षेत ३० विद्यार्थी ९० पर्सेन्टाईलच्या वरती आहेत, ही संजीवनीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभा संपन्नतेची सिध्दता आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत आक्टोबर/नोव्हेंबर, २०२१ दरम्यान प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औशधनिर्माण शास्त्र प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यातुन ८ लाखांपेक्षा अधिकविद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेमध्ये १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे तर २ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड् परीक्षेमध्ये झाले आहेत. यातील काही गुणवंत विध्यार्थी पुढीलप्रमाणे. कंसात पर्सेंटाईल दिले आहेत.
पीसीएम गटः ऋषिकेश शरद गाडेकर (९९. ९७ ), प्रज्वल विलास मापारी ( ९६. ५९), ज्ञानेश्वर विजय शिंदे ( ९६. २२), अब्बुसामा मोहम्मदइस्माईल मोमिन (९५. २६), समर्थ राजेंद्र कुलकर्णी (९४. २६), वैष्णवी प्रदिप पटारे (९३. १३), ऋषिकेश गोरख वहाडणेे ( ९२. ८९), प्रतिभा हिरामण पगार (९१. ९४), साक्षी ज्ञानदेव शिंदे (९१. ७०), अनुश्री श्रीराम तांबे (९१. ३० ),अंकित संतोष धाडीवाल (९१. १३), समर्थ जालींदर कडू (९०. ६१) पारस श्रीकांत शिरसाठ ( ९०. २८ 8) व समिर भिमराज मुंगसे (९०. ००).
पीसीबी गट: किर्ती दत्तात्रय निकम (99.10), प्रतिक्षा लक्ष्मण मोरे (98.73), ध्रती नितीन रावळ (98.25), श्रृती अनिल जाधव (97.35), राहीत काकासाहेब इंगळे (96.84), अनुजा गणेष बसवेकर (95.59), दिप्ती संजय टुपके (95.24), प्रविण संभाजी पोटे (95), सायली नारायण उषिर (94.31), ऋतुजा संदिप गायकवाड (94.04), स्नेहल हरी वाघ (93.75), क्रिषराज धनंजय बडदे (93.60), वैभव गोरख चैधरी व मिलींद भिका सोनवणे, अब्बुसामा मोहम्मदइस्माईल मोमिन (92.72), स्नेहल प्रभुदान मोंडल (91) व वफियाह मुझफ्फरली सय्यद (90.45).
चौकट
आपल्या यशाबद्धल ऋषिकेश गाडेकर व किर्ती निकम म्हणालेकी संजीवनी ज्युनिअर काॅलेज मधिल अनुभवी प्राद्यापक वर्ग, नियमित करून घेण्यात आलेला सराव, व्यवस्थापनाने विध्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी घालुन दिलेली शिस्त व मेंटर पध्दती अंतर्गत वैयक्तिक लक्ष या सर्व बाबींमुळे आम्ही सहज चांगले यश मिळवु शकलो. याचबरोबर आई वडीलांकडून मिळत असलेल्या पे्ररणेमुळे आम्ही चांगल्या यशाला गवसणी घालु शकलो.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य डाॅ. आर. एस. शेंडगे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. ऋषिकेशच्या राज्यस्तरीय यशाबध्दल श्री नितिन कोल्हे व श्री सुमित कोल्हे यांनी त्याचा व वडीलांचा सत्कार केला
0 Comments