आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

माझा ज्ञानोबा मालिकेतील कलाकारांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व परमपूज्य रमेश गिरी महाराजांच्या हस्ते सत्कार.

माझा ज्ञानोबा मालिकेतील कलाकारांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व परमपूज्य रमेश गिरी महाराजांच्या हस्ते सत्कार.




कोपरगाव प्रतिनिधी :---- मायबोली चॅनेलवरील अज्ञात सत्य सांगण्याचे धाडस करणारी व समस्त वारकरी संप्रदायाची व जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित मालिका "माझा ज्ञानोबा" ३० सप्टेंबर २०२१  पासून गुरूवार शुक्रवार व शनिवार रात्री ९ ला  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कोपरगाव तालुक्यात जन्मलेल्या तरुणांनी एकत्र येत एक सत्य संकल्प करीत आर्विक प्रोडक्शन, कोळपेवाडी यांच्या संकल्पनेतुन एक इतिहास रचत जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित मालिका "माझा ज्ञानोबा" ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 "माझा ज्ञानोबा" या मालिकेतिल संबंधित सर्वच मंडळी ही कोपरगाव तालुक्यातील आहे.या मुळे कोपरगाव तालुका मराठी चित्रपट सृष्टीत आपले एक भक्कम स्थान निर्माण करताना दिसत आहे. या मालिकेतिला सर्वच व्यक्तीनि राष्ट्रसंत जनार्धन स्वामी आश्रमात महंत.रमेशगिरीजी महाराज यांचा मालिका यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेतला आहे. यावेळी सर्वाचा रमेशगिरीजी महाराज व कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष, तालुक्यातील तरुणांनी प्रत्येक क्षेत्रात कायम अग्रेसर असावे अशी भूमिका ठेवणारे  व तरुणांच्या कायम पाठिशी राहून कौतुकाची थाप देणारे व मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगणारे मंगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा  सत्कार करण्यात आहे.

महाराष्ट्राच्या आध्यात्माच्या जगात एक इतिहास आहे याची  ओळख करून देण्यासाठी माझा ज्ञानोबा मालिकेची निमित्त झाली आहे.

 "माझा ज्ञानोबा" या मालिकेची निर्मित कोपरगाव तालुक्यातील आर्विक प्रोडक्शनच्या  माध्यमातून होत आहे. या मालिकेचे उभरते निर्माते जलाल महाराज सय्यद, प्रशांत पवार, पटकथा संवाद  जलाल महाराज सय्यद , सह निर्माता - प्रमोद भळगट, ह.भ.प. शुभम पानगव्हाणे,कार्यकारी निर्माते  सुमित पवार, सह पटकथा लेखक  सुदर्शन खडांगळे, संगीत संयोजन  शामजी गोराणे, अरूण महाराज पगारे,  कला दिग्ददर्शक, रमेश टिक्कल सर  पार्श्वगायक रवी महाराज पवार, ज्योतीताई गौराणे, सह संकलन सागर पवार,दिग्दर्शन प्रमोद श्रीवास्तव आदी  सर्व  "माझा ज्ञानोबा" टीम कोपरगाव तालुक्यातील आहे. हे सर्व मंडळी वारकरी आहेत व  यातील भूमिका करणारे बहुतांश कलाकारही वारकरीच आहेत. म्हणूनच "माझा ज्ञानोबा" ही मालिका एक इतिहासच आहे.*


या मालिकेचे खास आकर्षण म्हणजे

ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा गोविंदपंत यांच्यापासून मालिकेची सुरुवात,

 ज्ञानेश्वर माऊलींच्या जिवणप्रवासात महत्वाची, निर्णायक भूमिका असणारे, संत भोजलिंग काका यांचे चरित्र प्रथमच प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

 यावेळी मंगेश पाटील यांनी   "माझा ज्ञानोबा" या टीमला शुभेच्छा दिल्या आहे या वेळी ते म्हणाले आहे की,

माझा ज्ञानोबा या मालिकेतिल संबंधित सर्वच मंडळी ही कोपरगाव तालुक्यातील आहे ही सर्व कोपरगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या मालिके मुळे कोपरगाव तालुका मराठी चित्रपट सृष्टीत आपले एक भक्कम स्थान निर्माण करताना दिसत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. तालुक्यातील तरुणांनी कायमच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहून मराठी पाऊल कायम पुढे टाकत राहिले पाहिजे.ही मालिका पैसा मिळवण्यासाठी नाही तर ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रद्धेपोटी भक्तीपोटी निर्मित केलेली आहे.अज्ञात सत्य जगासमोर यावं यासाठी. "माझा ज्ञानोबा" च्या टीमने मोठी जबाबदारी घेतली आहे. टीव्ही, चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या गर्भश्रीमंत व्यक्तीलाही एकादी मालिका बनवताना प्रचंड अडचणी येतात. "माझा ज्ञानोबा" ची टीम तर वारकरी आहे. चित्रिकरणासाठी लागणारे तंत्रज्ञान, अर्थकारण, विषयाशी संबंधित साम्य असणाऱ्या वास्तू, नैसर्गिक स्थळे यांचे शोधकार्य, काही संदर्भांचे शोधकार्य इत्यादी कार्यामध्ये येणाऱ्या प्रचंड अडचणींवर मात करत, या टीमचा प्रवास आहे

या टीमच्या कष्टाला, तळमळीच्या श्रद्धेला, सत्यमेव जयते वृत्तीला मंगेश पाटील यांनी लाख लाख सलाम केला आहे.

या वेळी त्यांनी सर्व कोपरगाव  करांना आवाहन केले की,ही "माझा ज्ञानोबा" मालिका आपण पाहू, इतरांनीही पाहवी व आपण या मालिकेचा प्रसार करावा ही मालिका जास्तीजास्त प्रेक्षकांच्यापर्यंत पोहचायला हवी. तेच "माझा ज्ञानोबा" मधील वारकऱ्यांच्या कष्टांचं फळ असेल असे ते शेवटी म्हणाले आहे.

यावेळी महंत रामेशगिरजी महाराज यांनी या सर्वे कोपरगाव च्याभूमी पुत्रांना आशीर्वाद दिले त्याचप्रमाणे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी या टीमच्या सर्वांना पुढील चांगल्या कामासाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले व सर्वांनी ही मालिका आपल्या गावाच्या गावकऱ्यांनी केली असल्याने ते सर्वांनी शेवट परियन्त हे सिरीयल बघण्याचे आवाहन केले.यावेळी मनोज कानडे , शंतनू गुळसकर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments