माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :---- तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्षपदी चंद्रशेखर म्हस्के व शहरअध्यक्ष पदी निखिल डांगे यांची निवड झाल्याबद्धल त्यांचा सत्कार मराठा सेवा संघाचे माजी तालुकाअध्यक्ष मंगेश पाटील व मराठा महासंघाचे माजी उपतालुकाप्रमुख बाळासाहेब देवकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला
प्रत्येक तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा हे ध्येय उराशी बाळगून मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड एक नवी दिशा आणि नवा विचार देणारे कार्य यापुढे करणार असल्याचे मंगेश पाटील म्हणाले.
“अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” हा विचार तरुणांमध्ये रुजवून त्यांना जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या विषयांचे भान देणारे मार्गदर्शन आणि व्यावसायिक मेळावे अशाप्रकारचे कार्यक्रम राबविणार आहेत.
मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, राज्य संपर्कप्रमुख दशरथ गव्हाणे, जिल्हाध्यक्ष संतोष भागडे यांनी या दोघांची निवड केली. लवकरच शहर व तालुक्यातील नवीन पदाधिकारी याची निवड , नवीन दोन्ही पदाधीकारी करणार आहेत .
0 Comments