आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पिक विमा योजनेचे कोपरगाव तालुक्याला २ कोटी – आ. आशुतोष काळे

 पिक विमा योजनेचे कोपरगाव तालुक्याला २ कोटी  – आ. आशुतोष काळे



                 कोपरगाव प्रतिनिधी:---  खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना २ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असून हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

           खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये सुरुवातीच्या काळात काही महिने पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान होवून शेतकरी अडचणीत आले होते. खरीप हंगामात वेळेवर पाऊस नाही पडला तर बाजरी, सोयीबीन पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी ज्या गावातील खरीप पिकांचे पावसाचा खंड पडल्यामुळे नुकसान झाले आहे त्या पिकांची कृषी विभागाने पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेवरून कृषी विभाग व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करून पावसात खंड पडल्यामुळे बऱ्याच क्षेत्रावरील सोयाबीन, बाजरी पिकांचे नुकसान होवून मोठ्या प्रमाणावर उत्पन घटणार असल्याचा अहवाल सादर केला होता. शेतकऱ्यांनी बाजरी, सोयीबीन पिकांचे विमा काढलेले असल्यामुळे भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र नुकसान होवून बराच कालावधी झाला होता व खरीप हंगाम संपत येवून देखील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव महसूल मंडळाच्या गावातील सोयाबीन, बाजरी व दहेगाव बोलका महसूल मंडळाच्या गावातील सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने पिक विम्या पोटी २ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, कुषी मंत्री ना. दादा भुसे, कृषी राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांचे आभार मानले आहे. पावसाने खरिपाच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते व परतीच्या पावसाने देखील पुन्हा नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत होते. परंतु दिवाळीपूर्वीच पिक विमा योजनेच्या नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments