आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत कोविड लसीकरण

 एस.एस.जी.एम. महाविद्यालयात युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत कोविड लसीकरण कोपरगाव प्रतिनिधी:----

कोपरगाव येथील श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये मोफत कोरोना लसीकरण शिबीर पार पडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ तसेच राष्ट्रीय छात्र सेना, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

लसीकरण शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर थोपटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. लसीकरण शिबीर यशस्वी होण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोपरगाव येथील आरोग्य सेविका श्रीमती नंदू नवले, आरोग्य कर्मचारी कर्मचारी सौ. विजया दुशिंग, सौ. मीरा पवार, श्री. दीपक जाधव यांच्यासह डॉ. चंद्रभान चौधरी, प्रा. सौ. शोभा दिघे, प्रा. एम. के दिघे, प्रा. डॉ. सुरेश काळे, प्रा. अमोल चंदनशिवे, प्रा. डॉ. बी. एम. वाघमोडे यांचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अरुण देशमुख, डॉ. सुभाष रणधीर, डॉ. विजय निकम, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे, रजिस्टार  श्री. सुनील ठोंबरे, अधीक्षक श्री. सुनील गोसावी आदिंसह सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments