आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश – आ. आशुतोष काळे

 सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश  – आ. आशुतोष काळे



कोपरगाव प्रतिनिधी:----  मागील वर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण विश्व भयभीत झाले होते. या आजारावर कोणतीही ठोस उपचार नसल्यामुळे जगभरातील आरोग्य विभाग चिंतीत होता. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेळेत केलेल्या उपाययोजनांमुळे कोपरगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमपणे या जीवघेण्या संकटाचा मुकाबला करू शकली व या सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे सर्वसुविधांयुक्त जवळपास ३ कोटी रुपयांची इमारत बांधण्यात आली आहे. या चासनळी प्राथमिक आरोग्य केद्राला जिल्हा परिषदेकडून नुकतीच रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पंचायत समिती कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यात येणाऱ्या अडचणी नूतन इमारतीमुळे दूर झाल्या असून  रुग्णवाहिका मिळाल्यामुळे नागरिकांना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा कशी मिळेल यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी भर द्यावा. रुग्णांना आरोग्य सेवा देतांना अजूनही काही अडचणी असतील तर  त्या अडचणी बिनदिक्कतपणे सांगा त्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

    यावेळी पंचायत समिती सभापती  सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राहुल रोहमारे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, दिलीपराव चांदगुडे, सुनील गाडे, संदीप जाधव, प्रशांत वाबळे, दिलीपराव दाणे, बाबासाहेब शिंदे, राहुल जगधने, नारायण होन, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. सुनील

Post a Comment

0 Comments