कोकमठाणचे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद फटांगरे राष्ट्रवादीत दाखल
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य शरद फटांगरे यांनी नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकमठाण गावात मोठ्याप्रमाणात विकासकामे सुरु झाली असून अनेक विरोधी पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद फटांगरे यांनी देखील कोकमठाणमध्ये सुरु असलेल्या विकासप्रवाहात सहभागी होण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याप्रसंगी त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले. तसेच कोकमठाण तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजयराव रक्ताटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केला.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संजय थोरात, प्रकाश देशमुख, जालिंदर हाडोळे, ज्ञानेश्वर रक्ताटे, उपसरपंच दिपक रोहोम, संतोष लोंढे, पंकज लोंढे, बंटी सय्यद, दिनकर रोहोम, जॉनी धिवर, विशाल जाधव, अल्लाउद्दीन सय्यद, पप्पू कराळे, अनिल त्रिभुवन, किरण धिवर, विजय देशमुख, जावेद सय्यद, संभाजीराव देशमुख, सोमनाथ महाजन, कपील महाजन, अमोल जाधव, गणेश सोनवणे, दर्शन लोंढे आदी उपस्थित
0 Comments