विहिरीतील मोटारी चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीकडून १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
तालुका पोलिस स्टेशनची कारवाई
कोपरगाव प्रतिनिधी:--- शेतकरी बांधवांचे विहिरीतील मोटारींची चोरी करून त्यांचे विविध पार्ट वेगळे करून ते विकणाऱ्या तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात तालुका पोलीस स्टेशनला यश आले असून या आरोपींमध्ये शहरातील दत्तनगर येथील कृष्णा प्रकाश शिंदे वय 24, महेंद्र सिंग गोपाल सिंग राजपूत वय 30राहणार लक्ष्मी नगर शिर्डी तालुका राहता, हल्ली मुक्काम बैलबाजार रोड कोपरगाव गणेश रामनाथ खिलारी राहणार रुई तालुका राहता वय 29 यांना अटक करण्यात आली असून या आरोपींकडून १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की तालुक्यातील दहेगाव बोलका येथील शेतकरी शिवाजी पुंडलीक काशीद वय ५७ वर्ष राहणार विरभद्र मंदिर दहेगाव यांची पानबुडी मोटर (किंमत दहा हजार रुपये) दि २४रोजी चोरी गेल्या बाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. यावर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवून तपास सुरू केला दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांना गोपनीय बातमी मिळाली की प्रकाश शिंदे वय 24, महेंद्र सिंग गोपाल सिंग राजपूत वय 30राहणार लक्ष्मी नगर शिर्डी तालुका राहता, हल्ली मुक्काम बैलबाजार रोड कोपरगाव हे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोटारी चोरून आणून त्याचे सुटे पार्ट करत आहे. यावर पोलिसांनी छापा टाकला असता हे दोन्ही आरोपी मोटार घेऊन गाडीवरून चालले असताना यांना रंगेहात पकडले तसेच या चोरी मध्ये रुई येथील गणेश रामनाथ खिलारी हा देखील समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला असून त्यांची अधिक कसून चौकशी केली असता महेंद्र सिंग गोपाल सिंग राजपूत यांच्याकडून १० इलेक्ट्रिक मोटर व एक स्कूटर तसेच कृष्णा प्रकाश शिंदे यांच्याकडून ५ इलेक्ट्रीक मोटारी तोडलेल्या अवस्थेत स्पार्ट मिळून आले व गणेश रामनाथ खिलारी याने देखील मोटर चोरून आणली आहे. या आरोपीकडून चालू स्थितीत 12 व मोडतोड केलेल्या चार इलेक्ट्रीक मोटारी व त्या नेआण करण्यासाठी दोन मोटारसायकली तसेच इलेक्ट्रिक मोटर यांचे पार्ट चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य असे एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या आरोपींवर विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाचे चोरीचे गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस उपनिरीक्षक सुरेश नागरे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मस्के बाबासाहेब वाकोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, अंबादास वाघ, रमेश झेंडे आणिस शेख, अशोक काळे, राजीव कोतकर, रशीद शेख ,चालक रामचंद्र साळुंके, सायबर क्राईम चे फुल खान शेख प्रमोद जाधव आदींनी वरील कारवाई केली या कामगिरीबाबत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
0 Comments