कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात
महागाई भत्ता दिवाळसण आग्रिम फरक वेतन आदि देयके केले कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा.
कोपरगाव प्रतिनिधी:----- मागील दोन वर्ष कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगातच भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मागील दोन वर्ष कोणतेही सण, उत्सव आनंदात आणि एकत्र येवून साजरे करता आले नाही.
प्रत्येक कार्यालयाचे कर्मचारी हे त्यात कार्यालयांमध्ये जीव ओतून अहोरात्र मेहनत करून आपल्या विभागाची, आपल्या कार्यालयाची प्रतिष्ठा जपून नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे कार्य बजावत आहेत. परंतु त्या बदल्यात त्यांना मिळणारा पगार हा जर वेळेवर न झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराची हेळसांड होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार हा वेळेत मिळावा यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मचाऱ्यांना येणाऱ्या दिवाळीसणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी (१) दिवाळीसण अग्रिम (२) कोविड काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा (३) ५% महागाई भत्ता (जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९) फरक (४)माहे ऑक्टोबर महिन्याचा पगार इत्यादी. कर्मचारी अधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे कोपरगाव नगरपरिषद येथे रुजू झाल्यापासून त्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन हे महिन्याच्या एक तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावेत या अनुषंगाने आस्थापना विभाग, लेखा विभाग यांना सूचना करून मार्गदर्शन केले. त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकारी यांचा पगार दरमहा १ तारखेस त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकारी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व कर्मचारी अधिकारी यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी आणि नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांचे आभार मानले.
0 Comments