आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे नियुक्ती बद्दल माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी केला सन्मान.

 राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे नियुक्ती बद्दल  माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी केला सन्मान.कोपरगाव प्रतिनिधी :----- अभ्यासू,विषयांची मुद्देसुद मांडणी, सडेतोड उत्तर आणि करारीपणा यामुळे महाराष्ट्र राज्यात रुपालीताईं चाकणकर यांची ओळख आहे.राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद देऊन महिलांविषयी काम करण्याची संधी दिली.याच संधीचे सोनं करित रुपालीताई चाकणकर विविध विषयांवर काम करत असतांना महाराष्ट्र राज्यशासनाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून मानचे पद देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली असल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले या संधीचे रुपालीताई नक्की सोनं करतील आणि महिलांचे राज्य पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतील असे सांगितले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात   तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे नियुक्ती बद्दल कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी फेटा,पुष्पहार देऊन सन्मान करुन शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments