आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -आ.आशुतोष काळे

 कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -आ.आशुतोष काळे



कोपरगाव प्रतिनिधी:--- सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली या संधीतून मतदार संघाच्या विकासासाठी दोन वर्षात रस्ते,वीज,पाणी व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून कोपरगावचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पोहेगाव ते वेस (ग्रा.मा. ५२) चे ४० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघाच्या रस्ते,वीज आणि पाणी या समस्यांबरोबरच कोरोना संकटामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला असतांना त्यावर मात करून कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवला व अशा प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघाच्या विकासासाठी निधीचा ओघ कमी पडू दिला नाही व यापुढे देखील कमी पडणार नाही.गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपये निधीला मंजुरी मिळविली  आहे. दरवर्षी १०० कोटी रुपये मिळणार असून चालू वर्षात आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.त्या निधीतून लवकरच कालव्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत.मतदार संघातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना देऊन तुम्ही मला आमदारकी दिली. अशीच साथ मला येणाऱ्या निवडणुकांमध्ये अपेक्षित असून आजपर्यंत आपण विकासाच्या बाजूने उभे राहिलात यापुढे देखील माझ्या पुढील वाटचालीत आपण विकासाच्याच बाजूने उभे राहावे.आपणा सर्वांना सोबत घेऊन मतदार संघाचे गतवैभव नक्की परत मिळवू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.


याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, बाबुराव थोरात, सचिन मुजगुले, नंदकुमार औताडे, एम.टी. रोहमारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, योगेश औताडे, राजेंद्र औताडे, मधूकर औताडे, जयवंत रोहमारे, किसन पाडेकर, बाळासाहेब औताडे, सतिश औताडे, नितीन शिंदे, अरुण औताडे, सिकंदर इनामदार, कौसरभाई इनामदार, संतोष वाके, दिलीप जुंधारे, संजय रोहमारे, जालिंदर कोल्हे, नरहरी रोहमारे, राजेंद्र पाचोरे, प्रमोद आभाळे, गोकुळ पाचोरे, किरण भालेराव, ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोतकर, वसंतराव पाचोरे, गंगाधरजी घारे, पंचायत समितीचे गायकवाड, ग्रामसेवक पी.एम. बरबडे, कॉन्ट्रॅक्टर गीते, रामाजी औताडे

Post a Comment

0 Comments