आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी

आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी



कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.  

राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधून मतदार संघात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देवून भरपाईची मागणी केली. आ. आशुतोष काळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला  शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सखोल जाणीव आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. मागील दोन वर्षात ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे अस्मानी संकटामुळे व आलेल्या पुरामुळे नुकसान झाले आहे त्या त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने वेळेत मोठी मदत दिली आहे. मागील दोन वर्षाप्रमाणे यावर्षी देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होवून सोयाबीन, मका, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना यापूर्वी देखील वेळोवेळी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळी देखील मदतीची अपेक्षा असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीला  ना.हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले.

 या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा.ना.सौ. राजश्री घुले, पोलीस अधीक्षक डॉ. मनोज पाटील,मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments