आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करण्यासाठी शिष्ठमंडळासह जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक घेऊ: आ.आशुतोष काळे

 समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करण्यासाठी

शिष्ठमंडळासह जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक घेऊ: आ.आशुतोष काळे




कोपरगांव प्रतिनिधी:----- पाण्याच्या बाबतीत कोणावरही अन्याय होऊ नये. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन २००३ मध्ये समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. या कायद्यामुळे जोपर्यंत जायकवाडी धरणामध्ये ६५ टीएमसी पाणीसाठा होत नाही. तोपर्यंत नगर-नाशिकच्या धरणामधून जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागते. हे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात काहीसे अन्यायकारक असल्यामुळे या समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करण्याबाबत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जलतज्ञ व शिष्टमंडळासह जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील यांच्या समवेत लवकरच बैठक घेऊ अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.


शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी नुकतीच आ.आशुतोष काळे यांची भेट घेऊन समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेऊन गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याबाबत निवेदन दिले आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, समन्यायी पाणीवाटप कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. याबाबत मी लाभधारक शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यात सुधारणा करण्याबाबत विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाचे गांभीर्य जलसंपदा मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. जायकवाडी धरण साठ्यात ६५ टीएमसी साठा झाला नाही तर त्याचा थेट परिणाम गोदावरी कालव्यांच्या रोटेशनवर होतो.



पावसाने चालू हंगामातील सरासरी ओलांडल्यामुळे नगर-नाशिकचे धरणे व जायकवाडी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. सुरुवातीला नगर-नाशिकमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे लाभधारक क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण पसरून काळजीची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी मराठवाड्यात मात्र अतिवृष्टी होत होती. जर अशा प्रकारचे हवामान राहिले तर समन्यायी पाणी वाटप कसे करणार? हा महत्वाचा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे या कायद्यात काहीशा त्रुटी असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढा सुरू असून ती थांबणार नाही. समन्यायी पाणी वाटप कायद्याने कुणावरही अन्याय होता कामा नये अशीच माझी भूमिका असून या कायद्यात नव्याने सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच शिष्टमंडळासह जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल, माजी शहरप्रमुख भरत मोरे, तुषार विध्वंस, राऊसाहेन थोरात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments