कर्मवीर नगर, दुल्हनबाईवस्ती परिसरात घरांमध्ये पावसाचे पाणी, नागरिकांनी दिला उपोषणाचा इशारा
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:- शहरहद्दवाढ झाल्यानंतर शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या दुल्हनबाईवस्ती तसेच कर्मवीर नगर भागात पश्चिम भागाकडून वाहत येणारे पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याने नागरीकांची मोठी तारांबळ उडाली आहे तसेच या परिसरामध्ये अनेक गटारींची कामे अपूर्ण असल्याने गटारी मधील मैलामिश्रित पाणी परिसरात येऊन डासांचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह मुलांमध्ये आजारी पडणे आजारी पडण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकांदा पालिकेला वेळोवेळी तोंडी व लेखी देखील निवेदने दिली आहेत सदर प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे मात्र पालिकेकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसून सध्या पावसाळ्यामध्ये या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे तरीदेखील पालिकेने या समस्येवर गांभीर्यपूर्वक विचार करावा व तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे यासंदर्भात नगरपालिकेला वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष संदिप कपिले व शहर उपाध्यक्ष भावेश थोरात यांनी हा प्रश्न न सुटल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
0 Comments