Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचा देशात रॅन्क बॅण्ड ७६-१०० : श्री अमित कोल्हे. भारतर सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे परीक्षण

  संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचा देशात  रॅन्क बॅण्ड ७६-१००   : श्री अमित कोल्हे.

भारतर सरकारच्या शिक्षण  मंत्रालयाचे परीक्षण

 

कोपरगाव प्रतिनिधी:------ भारत सरकारच्या शिक्षण  मंत्रालयाने नॅशनल इन्स्टिट्यूशनल  रॅन्कींग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) अंतर्गत विविध निकषांच्या आधारे व सादर केलेल्या पुराव्यांची शहानिशा  करून संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाची देश  पातळीवर रॅन्क बॅण्ड ७६- १०० मध्ये निवड करून महाविद्यालयाचा दर्जा व गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. नाशिक  व अहमदनगर जिल्ह्यातील  संजीवनी ही एकमेव रॅन्कींग बॅण्डच्या कसोटीतील संस्था आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की देशात  सुमारे १४०० पेक्षा अधिक फार्मसी मधिल पदवी शिक्षण देणाऱ्या  संस्था आहेत. त्यातील सुमारे ९५० संस्था खाजगी आहेत तर उर्वरित संस्था सरकारी आहेत. या सर्व संस्थां मिळुन ३५१ संस्थांनी एनआयआरएफ मध्ये सहभाग नोंदविला. 
यात व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली  प्राचार्य डाॅ. किशोर  साळुंखे, समन्वयक प्रा. गिरीश  काशीद  व डाॅ. रसिका भालके यांनी एनआयआरएफच्या विहित नमुन्यामधिल प्रश्नावली  नुसार माहिती व पुरावे अपलोड केले. यात प्रामुख्याने प्रभावी अध्यापन-अध्ययन पध्दती व त्यासाठी आधुनिक मार्गांचा अवलंब, विद्यार्थी व शिक्षकांचे संशोधन  कार्य व पेटेंटस्, पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे  विविध नामांकित कंपन्यांमधिल नोकरीचे स्थान अथवा उद्योजग म्हणुन असलेले स्थान, संस्थेची पोहच आणि सर्वसमावेशकता, संस्थेचे निकाल, पी. एच.डी. ही पदवी प्राप्त केलेल्या प्राद्यापकांचे प्रमाण, विद्यार्थी व प्राध्यापकांनी राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  पातळीवर यादर केलेले शोध  निबंध, विविध स्पर्धात्मक परीक्षांमधिल विद्यार्थ्यांनी  मिळविलेले नैपुण्य, अभ्यासक्रम आणि अतिरीक्त अभ्यासक्र उपक्रमांमधिल विद्यार्थ्यांचा  सहभाग आणि त्यातुन मिळविलेले यश , संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने बी. फार्मसी व एम. फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यामधिल मिळत असलेल्या नोकऱ्या , इत्यादी बाबींचा समावेश  होता. या सर्व निकषांचे  पुराव्यांसहित समर्पक सादरीकरण करण्यात आले होते. या सर्व बाबींची शहानिशा  करून एनआयआरएफ अंतर्गत भारत सरकारच्या शिक्षण  मंत्रालयाने संजीवनी फार्मसी ही एक दर्जेदार संस्था म्हणुन रॅन्क बॅण्ड ७६-१०० या वर्गवारीमध्ये समावेश  केला आहे. 
मजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला केंद्र सरकारने गुणवत्ता व दर्जेदार महाविद्यालयाच्या यादीत घोषित  केल्या बध्दल समाधान व्यक्त करून प्राचार्य व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments