आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राज्यमार्ग ७ ते शिलेदार वस्ती रस्त्याने घेतला मोकळा श्वास

   राज्यमार्ग ७ ते शिलेदार वस्ती रस्त्याने घेतला मोकळा श्वास  कोपरगाव प्रतिनिधी:-----  कोपरगाव तालुक्यातील मढी बु. शिवारातील राज्यमार्ग ७ ते शिलेदार वस्ती हा एक किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९०६ चे कलम ५ (२) अन्वये तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खुला करण्यात आला असल्याची माहिती मंडल अधिकारी योगेश पालवे यांनी दिली असून या रस्त्याने मोकळ श्वास घेतल्यामुळे या रस्त्याचा मढी बु.च्या अनेक नागरिकांना फायदा होणार आहे.

                हा रस्ता खुला करून मिळावा यासाठी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय कोपरगाव यांच्याकडे लेखी पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय कोपरगाव यांनी मौजे मढी बु. शिवारातील राज्यमार्ग ७ ते शिलेदार वस्ती हा एक किलोमीटरचा रस्ता जाण्या-येण्यासाठी खुला करण्याबाबत  मंडल अधिकारी, कामगार तलाठी तसेच अर्जदार यांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडून लेखी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दिनांक २/०९/२१ रोजी  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९०६ चे कलम ५ (२) अन्वये खुला करण्यात आला आहे. हा रस्ता खुला करण्यात आल्या मुळे ३० ते ४० कुटुंबांना या रस्त्याचा उपयोग होणार असल्याने या रस्त्यालगत असणाऱ्या रहिवाशांनी समाधान मध्ये व्यक केले आहे.याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, तलाठी गणेश गरकल, मंडलाधिकारी योगेश पालवे,पोलीस हेड कॉन्स्टेबल सतिष भताणे, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष इंद्रभान ढोमसे, मढी बु.सरपंच प्रविण निंबाळकर,उपसरपंच निवृत्ती गवळी, सदस्य, ग्रामसेवक रामेश्वर नेवगे, कोतवाल सचिन आभाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments