आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

दरोड्यात लुटलेले महिलेचे सोने पुन्हा पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महिलेच्या स्वाधीन.

दरोड्यात लुटलेले महिलेचे सोने पुन्हा पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महिलेच्या स्वाधीन.

 पो.नि.दौलतराव जाधव व त्यांच्या टीमची दबंग कामगिरी 
कोपरगाव प्रतिनिधी:-----

 कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे घराचे दरवाजावर दगड टाकुन,दरवाजा तोडुन,घरातील महिलेस जबर मारहाण करुन तिच्याकडील सोने व चांदीचे दागिणे आरोपींनी जबरीने चोरुन नेले होते. सदरचे सोने व चांदीचे दागिणे आरोपींकडुन हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशाने कोपरगाव तालुका पोलिसांनी त्या महिलेकडे केले सुपूर्द....पोलिसांचे सर्वत्र कौतुक.

 सदरचे वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील बोकटे रोड ओगदी येथील रहिवासी सौ.कमलबाई लक्ष्मण जोरवर,वय 45 वर्षे 

कोपरगाव यांनी फिर्याद दिली होती की,  दिनांक 09/01/2021 रोजी रात्री 1.45वाजेच्या सुमारास. सर्वे नं. 121/3,बोकटेरोड,ओगदी,ता.कोपरगाव येथे तिन अनोळखी चोरट्यांनी

सौ.कमलबाई लक्ष्मण जोरवर यांच्या घराच्या दरवाजावर दगड टाकुन,दरवाजा तोडुन,घरात प्रवेश करुन सौ कमलबाई यांच्या डाव्या

हातावर,पाठीवर.मांडीवर लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन हात फ्रेंक्चर करुन त्यांच्या  ताब्यातील

रोख रुपये ,सोने चांदीचे दागिणे व साड्या असा एकुण रुपये 3,19,200/- किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला

होता. त्यांचे फिर्यादीवरुन कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनला दिनांक 09/01/2021 रोजी 

कलम 394,397,457,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


सदरचा गुन्हा सचिन उर्फ संजय उर्फ

बॉग्या सखाहारी चव्हाण,वय 28 वर्षे, रा.पढेगाव,ता.कोपरगाव, जि.अहमदनगर , सचिन विरुपन भोसले,वय 21

वर्ष,रा. गाजगाव,ता.गंगापुर,जि.औरंगाबाद,  संकेत मेहंद्या उर्फ महेंद्र चव्हाण,रा.शिर्डी,ता.राहाता (फरार) अशांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन उर्फ संजय उर्फ बोंग्या सखाहारी चव्हाण,वय 28 वर्षे रा पढेगाव, ता.कोपरगाव,जि.अहमदनगर याचेकडुन 16 ग्रॅम 900 मि.ली सोन्याची लगड व 250 ग्रॅम चांदीची

लगड तपासादरम्यान जप्त करण्यात आली होती. सदर सोने व चांदीची लगड मा. न्यायालय,कोपरगाव यांचे

आदेशाने फिर्यादी सौ.कमलबाई लक्ष्मण जोरवर,रा.ओगदी ता.कोपरगाव यांच्या ताब्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सुपूर्द आहे. यावेळी सौ.कमलबाई लक्ष्मण जोरवर यांनी त्याचे आभार मानले आहे. तालुका पोलिसांच्या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments