Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

शिर्डी साई संस्थान विश्वस्त मंडळाला मिळाला अखेर मुहूर्त;अध्यक्षपदी आम. आशुतोष काळे तर उपध्याक्षापदी जगदीश सावंत.

 शिर्डी साई संस्थान विश्वस्त मंडळाला मिळाला अखेर मुहूर्त;अध्यक्षपदी आम. आशुतोष काळे तर उपध्याक्षापदी जगदीश सावंत.


कोपरगाव प्रतिनिधी :----
गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत असलेल्या व संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिर्डी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची आज दि १६सप्टेंबर रोजीअखेर   महाराष्ट्र शासनाने  अधिकृत  घोषणा केली  असून या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 


गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर विश्वस्त म्हणून अनुराधा आदिक, सुहास आहेर, अविनाश दंडवते,  सचिन गुजर, राहुल कनाल,  सुरेश वाबळे, जयंवतराव जाधव, महेंद्र शेळके, एकनाथ गोंदकर, तर शिर्डी नगरपंचायत अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments