Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी केलेला त्याग समाज कधीही विसरणार नाही–आ. आशुतोष काळे

  कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी केलेला त्याग समाज कधीही विसरणार नाही–आ. आशुतोष काळेकोपरगाव प्रतिनिधी:----- जीवघेण्याकोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण विश्वातील आरोग्य व्यवस्थेला मोठे आवाहन होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या अनुभवाच्या जोरावर अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून असंख्य रुग्णांना कोरोनामुक्त केले.आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी रुग्णसेवा करतांना केलेला त्याग समाज कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

                    कोपरगाव येथे डॉ. दत्तात्रय मुळे,डॉ.चंद्रशेखर आव्हाडडॉ. प्रविण गायकवाडडॉ. शिरीष मुळेडॉ. सुनील पवार व नारायण दाणे या डॉक्टरांनी एकत्र येवून नव्याने सुरू केलेल्या साईसेवा सी.टी.स्कॅन सेंटरचे उदघाटन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाने आपल्या नात्यातील जवळची व्यक्ती गमविली आहे. आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत आपण खूप मागे होतो त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या महामारीनेडॉक्टरांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला दाखवून दिले. ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीही सी.टी.स्कॅन हा शब्द ऐकला नाही त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर एचआरसीटी स्कोर तपासणीसाठी सी.टी.स्कॅन करावे लागले. भविष्यात  सी.टी.स्कॅनची गरज पडू शकते या उद्देशातून साईसेवा सी.टी.स्कॅन सेंटरची मदत होणार असून रुग्ण सेवा, हीच ईश्वरसेवा हे व्रत डोळ्यापुढे ठेवून रुग्णांना माफक दरात उपचार मिळतील असा आशावाद व्यक्त केला. 

                  यावेळी राहुरीचे प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगतापजि. प. सदस्य राजेश परजणेराहुल रोहमारेकोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हेडॉ.महेंद्र गोंधळीमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेनगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेराजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदारराष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशीग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदरतालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलपडॉ.अजय गर्जेडॉ. तुषार गलांडेडॉ. अमोल अजमेरेडॉ. अतिष काळे,डॉ. दीपक पगारेदिनार कुदळेसंदीप कपिलेराहुल देवळालीकरकार्तिक सरदारप्रशांत वाबळेनारायण लांडगेमुकुंद इंगळेराजेंद्र आभाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments