आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

विविध लेखकांच्या भूमिका साकारत समतात हिंदी दिवस साजरा.

विविध लेखकांच्या भूमिका साकारत समतात हिंदी दिवस साजरा.
कोपरगाव प्रतिनिधी:------ प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील विविध लेखक, कवी,साहित्त्यिकांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या भूमिकेतून त्या लेखकांची ओळख करून दिली. त्यात कुलदिप कोयटे याने मुन्शी प्रेमचंद, उन्नती भवर हिने हरीवंशराय बच्चन, जान्हवी जानी हिने सुभद्रा कुमारी चौहान, मृदुला सोनकुसळे हिने  संत कबीर, आर्यन कदम याने शामसुंदर रावत, ख़ुशी कोठारी हिने मिराबाई आदींनी यांच्या भूमिका साकारत त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत त्यांनी हिंदी भाषेत दिलेल्या योगदानांचा परिचय करून दिला. तर हर्षिता लोकचंदाणी हिने हिंदी दिनाचे महत्व सांगत हिंदी भाषेविषयी असणारे प्रेम भाषणातून व्यक्त केले. इयत्ता ७ वी तील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून हास्य नाटिका सादर केली तसेच हिंदी गितांवर अप्रतिम नृत्य सदर केले. इ.१० वी तील विद्यार्थ्यांनी हिंदी चित्रपटातील डायलॉग सादर केले. हिंदी  दिनानिमित्त दिवसभर समताच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हिंदी भाषेतून संवाद साधला.

          समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये १४ सप्टेंबर हा ‘जागतिक हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान समता  इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी भूषविले. अध्यक्ष स्थानावरून बोलतांना ते म्हणाले कि,‘हिंदी भाषा ही ज्ञान भाषा असून राजभाषा देखील आहे. तिने  जागतिक स्थरावर व्यावहारिकदृष्ट्या महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे तसेच समतातील विद्यार्थ्यांनी देखील हिंदी भाषेचे ज्ञान अवगत करून जागतिक स्तरावर विचारांची देवाण घेवाण, सुसंवाद करण्यासाठी या भाषेला  अनन्यसाधारण महत्व द्यायला हवे. हिंदी भाषेच्या सन्मानासोबतच इतर सर्व भाषांना देखील समान दर्जा देऊन त्या आत्मसात कराव्यात.’

          समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,      मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांनी हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इ.१० ची विद्यार्थिनी नंदिनी कलंत्री हिने केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी माध्यमिक विभाग प्रमुख सौ.शिल्पा वर्मा, हिंदी विभाग प्रमुख  सौ. अनिता आढाव, शिक्षिका सौ.ज्योती घोलप व शिक्षक सुनील साळुंखे, यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शिक्षक सुनील साळुंखे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments