आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शहराचे नुकसान-तोडफोड करणाऱ्याना राजकिय पदाधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे.--- विजय वहाडणे

 शहराचे नुकसान-तोडफोड करणाऱ्याना राजकिय पदाधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे.--- विजय वहाडणे



     कोपरगाव प्रतिनिधी:-----       कोपरगाव शहरातील स्वा.सावरकर उद्यान,छ.शिवाजी महाराज उद्यान,जिजामाता उद्यानातील काही सिमेंटची बाके,
काही खेळण्या,काही संरक्षक भिंती-जाळ्या काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी तोडल्या आहेत.कर रूपाने जमा झालेल्या नागरिकांच्या पैशातून लाखो रू.खर्च करून विकास करण्याचा प्रयत्न सुरू असतो,पण काहीजण अशा प्रकारे शहराचेच नुकसान करत आहेत.गांधींनगर येथे नव्याने बांधलेल्या शौचालयातही
पायऱ्या-वायरिंग तोडून टाकले आहेत.काही ठिकाणी शौचालयाचे दरवाजेही चोरीला गेले.अनेकदा शौचालयातील बेसिन-भांडेही फोडले जातात.स्वा.सावरकर चौकात लाखो रू.खर्च करून बांधलेल्या स्वच्छता गृहातही(मुतारी) असेच नुकसान केले जात आहे.शहरात अजून स्वच्छता गृहांची आवश्यकता आहे,पण कुणाच्या भरवशावर काम करायचे?अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्याही आढळतात,त्यामुळे गटारी तुंबतात.
           शहरात अनेक ठिकाणी "ओपन जीम" उभारता येतील,सुशोभीकरणही करता येईल.पण शहरातील काही गुंड-व्यसनी अपप्रवृत्तीमुळे तेही करता येत नाही.कारण नगरपरिषदेला विकास कामांसाठी निधीची कमतरता असतांना असे होणारे नुकसान-तोडफोड योग्य नाही.अशाच प्रकारे तोडफोड-नुकसान होणार असेल तर सार्वजनिक शौचालये कायमस्वरूपी बंद करायची वेळ येऊ शकते,याची गंभीर नोंद शहरवासीयांनी व सर्वपक्षीय कार्यकर्ते,समाजसेवकांनी घेतली तर शहराचे हितच होईल.
शहराचे असे नुकसान-तोडफोड करणाऱ्याना राजकिय पदाधिकाऱ्यांनी वठणीवर आणले तर
बरे होईल असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे

Post a Comment

0 Comments