काका कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्त
समता तर्फे राज्यस्तरीय विझ किड्स स्पर्धेचे आयोजन
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :----- राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्त समता इंटरनॅशनल स्कूल तर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्या करता इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘विझ किड्स स्पर्धेचे’ चे भव्य ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी इ. ५ वी ते ७ वी असा ज्युनिअर गट व इ. ८ वी ते १० वी असे दोन गट बनविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एकुण ३ फेऱ्या असतील, पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयासह कोणत्याही एका कला गुणाचे सादरीकरण करून आपला व्हिडिओ संयोजकांना पाठवावयाचा आहे. दुसरी फेरी ही वन-टू-वन इंटरव्ह्यू ची असणार आहे. या मध्ये एक तज्ञ परीक्षक पहिल्या राउंड मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड, निवड,छंद,महत्वकांक्षा, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि विद्यार्थ्यांचे विशेष कला गुण यावर आधारित प्रश्न असतील, या फेरी मधून तिसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तिसरी फेरी हि अंतिम फेरी असेल या फेरीत ज्युरी पॅनेल फेरी असेल. या फेरीत ज्युरी पॅनेल विद्यार्थ्यासोबत संवाद साधतील. स्पर्धेतील स्पर्धकाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक ताणतणावा मध्ये न राहाता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी दिली.
या स्पर्धेची पारितोषिके पुढील प्रमाणे असतील. प्रत्येक गटासाठी पहिले पारितोषिक चषक, प्रमाणपत्र आणि रु.७,०००, दुसरे पारितोषिक चषक,प्रमाणपत्र आणि रु.५,०००, तिसरे पारितोषिक चषक, प्रमाणपत्र आणि रु.३,००० असून हि स्पर्धा राज्यातील सर्वच स्पर्धकांसाठी खुली असून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन समता इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यवाहक श्री.संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी केले.
0 Comments