Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

डांबरी रस्त्यावर डांबरानेच खड्डे बुजवायचे

 डांबरी रस्त्यावर डांबरानेच खड्डे बुजवायचे असतात! -- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

    


कोपरगाव प्रतिनिधी:------    खरे तर डांबरी रस्त्यांवर कधीही मुरूम टाकायचाच नसतो आणि रोलिंग तर नाहीच नाही , कारण रोलिंग केले की मुरुमाची लगेच माती होते. तसेच नुसता मुरूम जरी टाकला तर सरळ आहे की त्याची वाहने  गाड्या  जाऊन माती होते आणि पावसाळ्यात तर कधीच नाही ,कारण पाऊस पडला तर त्याचा चिखल होतो आणि मोटर सायकल व पायी चालणारे लोक सटकून पडतात व त्यांना दुखापत होते. असा सल्ला माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.  प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, 

 चारचाकी गाडीने चिखल लोकांच्यावर उडतो. नंतर पाऊस गेला की , कोरडे झाले की  त्याची धूळ तयार होते आणि सर्व गाव भर धुराडा उठतो , नाका तोंडात , डोळयांत धूळ जाते. श्वसनाचे ही आजार होतात . यांचा सर्वे वाहन चालकांना आणि विशेष करून व्यापारी आणि दुकानदारांना खूप त्रास होतो ..दुकान व त्यातील समानावर खूप धूळ बसते आणि त्यामुळे नुकसान सहन करावे लागते. साफ सफाई चा खूप त्रास होतो. 

मला हेच कळत नाही की इतके  साधे आणि सोपे आहे , नगरपालिका  खड्डे बुजवण्याचे  रिपेअर किंवा मेन्टेनन्स चे वार्षिक टेंडर काढत असते .आणि  ज्याला रोड चे काम दिले त्यानें त्याचे काम झाल्यावर काही महिने किंवा वर्ष, टेंडर मधील टाकलेल्या आर्टींंन  नुसार ते रिपेअर डाग डुजी करून द्यायची असते.  किंवा नगरपालिकेने डांबरी रस्त्यावरील किंवा काँक्रिट रस्त्यावरील खड्डे फक्त  डांबरा ने व काँक्रेट रस्त्यावरील काँक्रेट ने बुजवण्याचे वार्षिक टेंडर काढत असते .मग हे  सर्व का नाही उन्हाळ्यात बुजवून घेतले .नवीन रस्त्या करायची वाट बघत बसत साधे खड्डे ही नाही बुजवायचे का ? जनतेला किती त्रास होतो आणि साधे नवीन रस्ते होई पर्यंत डांबरी मटेरियल ने खड्डे जर बुजवले तर हा मुरूम टाकून जो त्रास जनतेला झाला तो झाला नसता.

खूप साधे सोपे असतांना किती त्रास सहनशील नागरपालिकेची पट्टी आगाऊ भरणाऱ्या कोपरगाव कारांना नगरपालिकेने द्यायचा. असा सवालही शेवटी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments