कोपरगाव नगरपरिषद मध्ये भारतीय अभियंता दिन साजरा.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :---- काल दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी भारतातील पहिले अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयातील अभियंता असलेल्या विविध विभागाचे अभियंते अधिकारी
याप्रसंगी दीपक बडगुजर-टाऊन प्लॅनिग अभियंता, भालचंद्र उंबरजे- संगणक अभियंता, नितेश मिरीकर- सिव्हील अभियंता, ज्ञानेश्वर चाकणे, मेकॅनिकल अभियंता, योगेश खैरे-आटोमोबाईल अभियंता पल्लवी सूर्यवंशी-इ अँड टीसी अभियंता रोहित सोनवणे-विद्युत अभियंता ऋतुजा पाटील-मेकॅनिकल अभियंता हर्षवर्धन सुराळकर-सिव्हिल अभियंता,गणेश आहिरे-संगणक अभियंता यांचा सन्मान याप्रसंगी शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी प्रत्येक अभियंता यांनी आपले शिक्षण आपल्या कार्याचा अनुभव तसेच भविष्यकालीन नियोजन याबाबत स्व परिचय करून दिला. यावेळी मुख्याधिकारी मा.शांताराम गोसावी मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अभियंते यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
तसेच चंद्रकांत साठे, रवींद्र वाल्हेकर, सुनील आरण आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र गाढे यांनी मानले.
0 Comments