कु.कोमल राजेंद्र हिंगमीरे यांचे एम सी जे परीक्षेत यश.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- येथील आनंद संगीत विद्यालयातील संगीत विशारद व मास्टर ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी कु.कोमल राजेंद्र हिंगमीरे यांनी नुकत्याच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे
कोपरगाव तालुक्यात प्रथमच महिला या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत.मागील वर्षी संगीतात अत्यंत अवघड असलेल्या विशारद परीक्षेत देखील त्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले होते.
त्यांच्या यशाबद्दल माजी आमदार स्नेहलता कोल्हे,संजीवनी उद्योग समूहाचे बिपीन कोल्हे,आनंद संगीत विद्यालयाचे संचालक अण्णा आढाव,शिक्षिका रेखा गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव आदिंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत
0 Comments