गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
कोपरगाव प्रतिनिधी:---- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचे वतीने उन्हाळी परीक्षा २०२१ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली व महाविद्यालय शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून महाविद्यालयात चि.यश श्रीकांत पोळ व शुभम बाळासाहेब रहाणे हे ९१.८९ % गुण मिळवुन प्रथम, चि. गणेश शंकर डेंगळे ९१% मिळवुन द्वितीय चि. संतोष रामदास हरळे ८८.२२% तृतीय आल्याची माहीती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.
महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल १००% एवढा लागला असून प्रथम क्रमांक चि. वैभव सुनील चांदगुडे ८१.६३ %, द्वितीय क्रमांक कु.अनेरी दत्तात्रय ठाणगे ८१.३८%. तृतीय क्रमांक कु.रितू दादासाहेब कदम ८१.२५ %, मिळविला आहे.
द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून यामध्ये मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक चि.दर्शन अनिल बनकर ८७.२५ %, द्वितीय चि. अनिकेत विठ्ठल पगार ८७.१३ %, तृतीय क्रमांक चि.शुभम वाकचौरे ८५.५ %, द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक चि. शुभम बाळासाहेब रहाणे ९१.८९% , द्वितीय क्रमांक चि. देवेंद्र केशव सपकाळ ८१.३३ %, तृतीय क्रमांक कु. साक्षी दिलीप निकम ७९.७३%, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु.वैष्णवी राजेंद्र गाडे ८७.३३ %, द्वितीय क्रमांक चि.किरण सुभाष कदम ८६.९३%, तृतीय क्रमांक कु.गायत्री मच्छिंद्र आहेर ८४.९९%, द्वितीय वर्ष सिव्हील विभागात प्रथम क्रमांक कु.गौरी संतोष रेपाळे ८०%, द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी गीताराम घोगाडे ७८%, तृतीय क्रमांक कु.महेश्वरी संतोष रेपाळे ७७.७५ % द्वितीय वर्ष ऑटोमोबाईल विभागात प्रथम क्रमांक कु. गौरी राजेंद्र गोसावी ७७.२९ %, द्वितीय क्रमांक कु. मनीषा अनिल पेंढारे ७५.१८%, तृतीय क्रमांक चि. प्रतिक राजेंद्र दवंगे ६८.१२ % गुण मिळविले आहे.
तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण १००% एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक चि.गणेश शंकर डेंगळे ९१ % , द्वितीय संतोष रामदास हराळे ८८.२२ %, तृतीय क्रमांक चि.प्रकाश गोरख कवडे ८८%, तृतीय इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक चि. यश श्रीकांत पोळ ९१.८९ % , द्वितीय क्रमांक कु. स्नेहल दीपक राजगुरू ८७.५० %, तृतीय क्रमांक कु.निकिता बाबासाहेब डोळे ८६.९४%, तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु.आकांश जयराम थेटे ८५.८८%, द्वितीय क्रमांक कु. ज्ञानेश्वरी मच्छिंद्र आहेर ८५.५६ %, तृतीय क्रमांक कु. गायत्री अण्णासाहेब राजगुरू ८४.९४%, तृतीय वर्ष सिव्हील विभागात प्रथम क्रमांक चि.भारत रामनाथ साळवे ८३.११ %, द्वितीय क्रमांक कु.ज्योती नानासाहेब निकम ८२.६७%, तृतीय क्रमांक शामकांत रमेश गायकवाड ८२.३३ % गुण मिळविले आहे. तृतीय वर्ष ऑटोमोबाईल विभागात प्रथम क्रमांक कु. रियाज अजीखा मुलतानी ८२.७६ %, द्वितीय क्रमांक कु. चिन्मय भालचंद्र सिरसाठ ७८ %, तृतीय क्रमांक चि. गौरव बाळनाथ घुमरे व श्रीनाथ सतीश पवार ७६.८६% गुण मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ.स्नेहलताई शिंदे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य सुभाष भारती सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
0 Comments