कोपरगावात भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----
शहरात १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. कोपरगाव नगरपालिकेचा ध्वजारोहण नगरपरिषदेचे जेष्ठ कर्मचारी राजेश गाढे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छता कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते, तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते, कॉंग्रेस कमेटी कार्यालय तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या हस्ते, टीडीपी कार्यालयात माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते तर तहसील कार्यालय येथे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी आमदार आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,पंचायत समितीच्या सभापती सौ पोर्णिमा जगधने, बिडीओ सचिन सूर्यवंशी,नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी , सर्व विभागातील अधिकारी , कर्मचारी, आजी - माजी नगरसेवक, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी विविध राजकीय, सामाजिक ,संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, शहरातील नागरिक आदी उपस्थित होते. या प्रसंगी तहसील कार्यालय येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या मोहत्सव २०२१ चे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे,माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे,नगराध्यक्ष विजय वहाडणे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments