आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

व्याजाचा बेकायदेशीर धंदा करून शहरात कुणी कायदा हातात घेणार असतील तर ते सहन केले जाणार नाही-- विजय वहाडणे.

 व्याजाचा बेकायदेशीर धंदा करून शहरात कुणी कायदा हातात घेणार असतील तर ते सहन केले जाणार नाही-- विजय वहाडणे.
कोपरगाव प्रतिनिधी:------  शहरातील हनुमान नगर या भागात काही गुंडांनी प्रमोद आरणे यांच्या घरावर हल्ला करून दहशत निर्माण केली.शेजाऱ्यांशी कुणाचेही कितीही वाद झाले तरी अशा प्रकारे अमानुषपणे मातंग समाजाच्या कष्टकरी कुटुंबाच्या घरावर जमाव घेऊन जाणे व महिलांना लोखंडी कांब वापरून जखमी करणे हा अत्यंत क्रूरपणा आहे.कायदे,पोलीस स्टेशन यांचा धाक संपला कि काय? व्याजाचा बेकायदेशीर धंदा करून शहरात कुणी कायदा हातात घेणार असतील तर ते सहन केले जाणार नाही.अशा माजलेल्या गुंडगिरीमुळे शहरात जातीय धार्मिक तेढ निर्माण होऊन वातावरण बिघडू शकते याची संबंधितांनी गंभीर नोंद घ्यावी.

गुंड मुस्लिम असो कि हिंदु त्याला वठणीवर आणलेच पाहिजे.शहरात अवैध धंदे वाढल्याची सर्वत्र चर्चा आहे.कष्ट न करता हाती पैसा आला तर गुंडगिरी नक्कीच फोफावते. अवैध धंदेवालेच शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणतात हाच शहराचा अनुभव आहे.वातावरण अजून बिघडू द्यायचे नसेल तर महिलांवर हल्ला करणाऱ्याना हद्दपार करणेच योग्य होईल.
गरीब महिलेवर हल्ला करण्याचा भ्याडपणा करून कुणीही स्वतःला डॉन समजू नये.गुंड पुंड वठणीवर आणण्याचे काम कायदा  तर करीलच,पण कोपरगावचे नागरिकही अशांचा बेत पाहतील हे गुंडगिरी करणाऱ्यानी लक्षात घ्यावे.पोलीस खात्यानेही जात धर्म न बघता कठोरपणे कारवाया कराव्यात.तरच शहरातील सामाजिक स्वास्थ्य टिकून राहिल.
महिला -मुलींवर हात टाकण्याचा नामर्दपणा सहन केला जाणार नाही.अपक्ष नगरसेवक श्री.मेहमूद सय्यद यांनी या घटनेचा निषेध करून योग्य भूमिका घेतली आहे.पण स्वतःला समाजसेवक म्हणविणारे स्वयंघोषित समाजसेवक मात्र का गप्प आहेत हे समजत नाही.तालिबानींचा निषेध केला तरी काहींना राग येतो हेही  आपल्या शहरासाठी आश्चर्यकारक व घातकच आहे.
शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडगिरी व अवैध व्यवसाय यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.विजय वहाडणे अशी मागणी विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

-
Write

Post a Comment

0 Comments