ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे : आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:--- मतदार संघातील जनतेला विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून प्रत्येक गावात विकास पोहोचत आहे. मतदार संघाच्या विकासाचे ध्येय मनाशी बाळगून विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावून जबाबदारी पार पाडत आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतींनी देखील गावच्या विकासासाठी आलेल्या निधीतून नागरिकांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
उक्कडगाव येथे खंडोबा मंदिर ते साहेबराव निकम घर रस्ता व ज्ञानदेव निकम घर ते उत्तमराव निकम घर रस्ता या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तालुक्याच्या सीमेवर असलेल्या उक्कडगाव विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिले. त्यामुळे अनेक रस्ते नकाशावरच नाहीत ते रस्ते नकाशावर आणून या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देवू. रस्त्यांबरोबरच पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करू. उक्कडगाव -तळेगाव रस्त्यासाठी निधी दिला आहे. उक्कडगाव मध्ये वाडीवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असून त्यांचेदेखील रस्ते, पाणी, वीज आदि प्रश्न सोडवणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,सांडूभाई पठाण, राहुल जगधने, वाल्मीक निकम,नानासाहेब निकम, आप्पासाहेब निकम, किसन निकम, सरपंच विकास निकम, बबनराव गाडे, माजी सरपंच पांडुरंग निकम, अंबादास निकम, भास्कर निकम, शत्रुघ्न कराळे, नवनाथ निकम, रमेश पोटे,भाऊसाहेब निकम, नानासाहेब निकम, भाऊसाहेब निकम, अण्णासाहेब निकम, काकासाहेब निकम,परमेश्वर कराळे, बापू त्रिभुवन, धोंडू निकम, सोपान होन, मच्छिन्द्र निकम, राजेंद्र निकम, संजय निकम,राहुल निकम, दीपक चव्हाण, रवींद्र निकम, दिगंबर निकम, हिरामण गुंजाळ, रामेश्वर निकम, चांगदेव निकम, नवनाथ नन्नवरे आदी उपस्थित होते
0 Comments